एक्स्प्लोर

आंबेनळी बस अपघात : सहा महिन्यानंतर मृत बस चालकाविरोधात गुन्हा

बस आंबेनळी घाटात कोसळून विद्यापीठाचे 30 कर्मचारी जागीच ठार झाले होते. तर या अपघातात प्रकाश सावंत देसाई हे एकमेव बचावले होते. बसचालक प्रशांत भांबेड हे त्यांच्या ताब्यातील बस (क्र. एम एच 08 ई 9087) ही दापोली ते महाबळेश्वर दरम्यान घेऊन जात होते.

रायगड : आंबेनळी घाटातील बस अपघात प्रकरणी सहा महिन्यांनंतर बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या 5 महिन्यांपूर्वी 28 जुलै रोजी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात कोकण कृषी विद्यापीठातील 30 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बस चालक प्रशांत भांबीड याच्याविरोधात पोलादपूर पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस आंबेनळी घाटात कोसळून विद्यापीठाचे 30 कर्मचारी जागीच ठार झाले होते. तर या अपघातात प्रकाश सावंत देसाई हे एकमेव बचावले होते. बसचालक प्रशांत भांबेड हे त्यांच्या ताब्यातील बस (क्र. एम एच 08 ई 9087) ही दापोली ते महाबळेश्वर दरम्यान घेऊन जात होते. प्रशांत भांबेड यांनी निष्काळजीपणाने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन वाहन चालवण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी 28 जुलै 2018 रोजी पावसाळी सहलीनिमित्त महाबळेश्वरला निघाले होते. त्यावेळी आंबेनळी घाटात बस कोसळून 31 पैकी 30 जण जागीच ठार झाले. या सहलीसाठी त्यांनी विद्यापीठाची बस भाड्याने घेतली होती. सकाळी सहाच्या सुमारास ही बस महाबळेश्वरच्या दिशेने जात होती. त्यावेळी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही बस आंबेनळी घाटात कोसळली होती. या अपघातात बसचा चेंदामेंदा झाला. बसमधील 31 पैकी 30 जणांचा जागीच मृत्यू झाला. मात्र प्रकाश सावंत देसाई हे आश्चर्यकारकरित्या बचावले. प्रकाश सावंत देसाई हे खोल दरीतून वर आले आणि त्यांनी मोबाइलवरुन विद्यापीठातील अधिकाऱ्यांना बस अपघाताची माहिती दिली. प्रकाश सावंत देसाई हेच अपघाताला कारणीभूत, मृतांच्या नातेवाईकांचा आरोप आंबेनळी बस अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत देसाई हेच या अपघाताला कारणीभूत आहेत, असा आरोप अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी केला होता. प्रकाश सावंत देसाई यांना विद्यापीठाच्या सेवेतून बडतर्फ करा आणि सीआयडीमार्फत चौकशी करा, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली होती. प्रकाश सावंत देसाई माध्यमांकडे वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत होते. ज्या ठिकाणी अपघात होऊन बस दरीत कोसळली, तिथला पूर्ण भाग हा कातळ आहे, तिथे मातीचा लवलेशही नाही, तिथून ट्रेकर्सही सहजरित्या वर चढू शकत नाहीत, मग प्रकाश सावंत देसाई कोणत्याही साधनाशिवाय वर कसे येऊ शकतात, पलटी होत असलेल्या बसमधून स्वतः तीन ते चार कोलांट्या खाल्ल्याचं प्रकाश सावंत देसाई सांगतात, मग एवढ्या कोलांट्या खाऊन बाहेर फेकला गेलेला माणूस सहजरित्या वर कसा येऊ शकतो, त्याच्या विधानांमध्ये विसंगती असून हाच गाडी चालवत होता आणि तोच या अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसमोर केला होता. अशा व्यक्तीला विद्यापीठाच्या सेवेत ठेवणं योग्य आहे का? त्यांची नुसती बदली करुन चालणार नाही, तर त्यांना सेवेतून बडतर्फ करुन चौकशी करावी. सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, तसेच नार्को टेस्ट करण्यात यावी आणि दोषी आढळल्यास त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी यावेळी संतप्त नातेवाईकांनी केली होती. अपघातातील मृतांची नावे 1. संदीप भोसले 2. प्रमोद शिगवण 3. पंकज कदम 4. संजीव झगडे 5. निलेश तांबे 6. संतोष झगडे 7. रत्नाकर पागडे 8. दत्तात्रय धायगुडे 9. हेमंत सुर्वे 10. सचिन गुजर 11. राजाराम गावडे 12. राजेश सावंत 13. रोशन तबीब 14. सुनील साठले 15. संतोष जालगावकर 16. राजेंद्र बंडबे 17. संदीप सुवरे 18. सचिन गिम्हवणेकर 19. सुयश बाळ 20. सचिन झगडे 21. प्रमोद जाधव 22. रितेश जाधव 23. विक्रांत शिंदे 24. सुनील कदम 25. जयवंत चौगुले 26. विनायक सावंत 27. राजेंद्र रिसबूड 28. किशोर चौगुले 29. संदीप झगडे 30. प्रशांत भांबीर एकमेव बचावले - प्रकाश सावंत देसाई

संबंधित बातम्या

पोलादपूर बस अपघात : शॉर्टकट ठरला मृत्यूचा मार्ग

पोलादपूर घाटात बस दरीत कोसळली, 30 जणांचा मृत्यू  

प्रकाश देसाई दरीतून वर आले, रेंज आल्यावर अपघाताची माहिती दिली!  

पोलादपूर बस दुर्घटना : बायकोने थांबवलं म्हणून जीव वाचला, प्रवीण रणदिवेंची पहिली प्रतिक्रिया 

पोलादपूर दुर्घटना: राष्ट्रपती, पंतप्रधान, राहुल गांधींनी व्यक्त केलं दु:ख

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 26 डिसेंबर 2024 : ABP MajhaKalyan Crime News : कल्याणमध्ये चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपीला फाशी द्या! Special ReportDevendra Fadnavis Gadchiroli Guardian Minister : गडचिरोलीचं पालकमंत्रिपद फडणवीसांकडे? Special ReportSanjay Raut on MVA : संजय राऊतांना 'लाडकी बहिणी'च्या नवऱ्याची चिंता, प्रकरण काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
Embed widget