Ambedkar Memorial At London : लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr B R Ambedkar) यांच्या स्मारकाचा ताबा घेण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारकडे (Maharashtra Government) पत्रव्यवहार केला आहे. केंद्र सरकारने राज्यातील सामाजिक न्याय विभागाला पत्र लिहिलं आहे. विदेशातील अभ्यासक आणि इतर संघटना या आम्हीही आंबेडकरवादी असल्याचे सांगत या स्मारकाचा ताबा मागत आहेत. त्यामुळे या स्मारकाचं ऑटोनॉमस युनिट तयार करण्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. आता केंद्र सरकार आणि इतर संघटना मागणी करत असल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनमध्ये (London) राहून शिक्षण घेतलेले ते घर महाराष्ट्र सरकारने 2015 मध्ये विकत घेतले होते. इथे स्मारक उभारण्यात आलं आहे. या स्मारकाची मालकी राज्य सरकारकडे आहे. 3.2 मिलियन पौंडमध्ये हे स्मारक राज्य सरकारने विकत घेतले आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन झालं होतं.


परदेशातील स्कॉलर आणि संघटनांकडून स्मारकाचा ताबा मिळण्याची मागणी


परंतु आता परदेशात शिकणारे विद्यार्थी किंवा स्कॉलर असो किंवा संघटनांनी आम्ही देखील आंबेडकरवादी आहोत, असं सांगत या स्मारकाचा ताबा मिळावा अशी मागणी केली आहे. त्याच अनुषंगाने केंद्र सरकराने आता राज्याच्या सामाजिक न्याय विभागाला पत्र लिहून स्मारकाचा ताबा केंद्र सरकारकडे द्यावा असं म्हटलं आहे. तसंच ऑटोनॉमस युनिट तयार करण्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. आता या पत्राला राज्य सरकार काय उत्तर देते हे पाहावं लागेल.


बाबासाहेबांचं वास्तव्य असलेल्या लंडनमधील घराचं स्मारकात रुपांतर


बाबासाहेब आंबेडकर हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना 1921-22 साली पूर्व लंडन भागातल्या 10 किंग हेन्री या वास्तूत राहात होते. ही इमारत खासगी होती. ही वास्तू लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने विकत घेतली. या वास्तूत आता बाबासाहेबांचं वस्तूसंग्रहालय आणि स्मारक बनवण्यात आले आहे 


हेही वाचा