Dr Ambedkar Jayanti 2024: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, देशभरात उत्साहाचे वातावरण

Dr Ambedkar Jayanti 2024 : डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकरांची यंदा 134 वी जयंती साजरी केली जात आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Apr 2024 06:35 PM
22 वर्षाच्या कलाकाराने रांगोळीच्या माध्यमातून केले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

धुळे शहरातील 22 वर्षे राहुल अहिरे या कलाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची रांगोळी साकारत बाबासाहेबांना अनोखी अभिवादन केले आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्यवर्ती पुतळ्याजवळ असलेल्या मोकळ्या मैदानावर ही रांगोळी साकारण्यात आली असून तब्बल दोन हजार स्क्वेअर फुटवर ही रांगोळी काढण्यात आली आहे. राहुल अहिरे याला ही रांगोळी काढण्यासाठी तब्बल तीन दिवस लागले असून साडेचार हजार किलो रांगोळी यात वापरण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांच्या संकल्पनेतून आणि काही आंबेडकरी तरुणांच्या सहकार्यातून ही रांगोळी राहुल अहिरे यांनी काढली आहे. ही रांगोळी पाहण्यासाठी धुळेकर नागरिकांची गर्दी होऊ लागली असून सध्या ही रांगोळी चांगला चर्चेचा विषय ठरली आहे. 

Ambedkar Jayanti 2024 : काही लोकं बाबासाहेबांना स्वीकारायला लागले, प्रकाश आंबेडकरांचा मविआला टोला

Ambedkar Jayanti  Live Update : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जनतेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आज काही लोक संविधान वाचविण्याच्या गोष्टी करायला लागलेत, ते बाबासाहेबांना स्वीकारायला लागले असल्याचा संकेत असल्याचे म्हणत आंबेडकरांनी  मविआला टोला लगावला आहे. 

Ambedkar Jayanti Live Update : नितीन गडकरी पोहचले दीक्षाभूमीवर, बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Ambedkar Jayanti 2024 :  नितीन गडकरी यांनी दीक्षाभूमीवर हजेरी लावत, बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अस्पृश्यता नष्ट करत सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा विचार दिला, त्यांनी संविधान दिलं. त्यांच्या स्मृती आम्हाला सगळ्यांना आयुष्य समाधान आणि देशासाठी काम करण्याची प्रेरणा देते असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. 

Ambedkar Jayanti Live Update : उदयनराजे भोसले यांच्याकडून आंबेडकरांना अभिवादन

Ambedkar Jayanti 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती आज साजरी केली जात आहे. या जयंतीनिमित्ताने सातारा लोकसभाचे इच्छुक उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून त्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा धागा पकडून संविधान लिहिले असल्याचे म्हटले. पण अशा महापुरुषांवर स्वताच्या स्वार्थासाठी शिंतोडे उडवले जातात, अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजेत अशी मागणी यावेळी त्यानी केली. 

Ambedkar Jayanti 2024 : जयंत पाटील दीक्षाभूमीवर पोहोचले, बाबासाहेबांना करणार अभिवादन

Ambedkar Jayanti  Live Update :  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील इतर स्थानिक नेत्यांसोबत दीक्षाभूमीवर पोहोचले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबाना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते दीक्षाभूमीवर पोहोचले आहे. 

Ambedkar Jayanti 2024 : पेंसिलच्या टोकावर बाबासाहेबांची प्रतिकृती, आंबेडकरांना अनोखे अभिवादन

Ambedkar Jayanti  Live Update : धाराशिवमधील प्रफुल आणि प्रकाश पांचाळ या बंधूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त पेंसिलच्या टोकावर बाबासाहेबांची प्रतिकृती साकारून बाबासाहेब आंबेडकराना अनोखे अभिवादन केले आहे. पेन्सिलच्या टोकावर साकारलेल्या या प्रतिकृतीत अत्यंत सूक्ष्म कोरीव असून, बाबासाहेबांना साकारण्यासाठी पाच तासांचा कालावधी लागला आहे. पांचाळ बांधवानी साकारलेल्या या आगळ्या वेगळ्या प्रतिकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Ambedkar Jayanti 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

Ambedkar Jayanti 2024 :  पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन 


 



Ambedkar Jayanti Live Update : दोऱ्याच्या साहाय्याने साकारली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा

Ambedkar Jayanti 2024 : सोलापुरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त एका कलाकाराने वेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांना मानवंदना दिली आहे. विपुल मिरजकर याने दोऱ्यांच्या साहाय्याने 4 फुटांची बाबासाहेबांची प्रतिमा साकारली आहे. यासाठी 3 हजार मीटर दोऱ्याचा वापर करण्यात आला असून, ही प्रतिमा सकरण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी लागलेला आहे.

Ambedkar Jayanti Live Update : अमरावतीच्या आंबेडकर चौकात आतिषबाजी, हजारोंच्या संख्येने गर्दी...

Ambedkar Jayanti 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 व्या जयंती अमरावती (Amravati) येथील इर्विन चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रात्री हजारोंच्या संख्येने अभिवादन करून जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी रात्री 11 वाजेपासूनच हजारोंच्या संख्येने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अमरावती येथील इर्विन चौकात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे गर्दी जमली. यावेळी मोठ्या प्रमाणात आतिषबाजी देखील करण्यात आली. 

Ambedkar Jayanti Live Update : बाबासाहेबांच्या जयंतीच्या उत्साहात आदित्य ठाकरे सहभागी

Ambedkar Jayanti 2024 :  वरळीत आंबेडकर भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मध्यरात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी बँड वाजवत वरळीकरांच्या जल्लोषात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे आणि विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्यासह शेकडो वरळीकरांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.  डॉ. बाबासाहेबांची जयंती देशभरात उत्साहात साजरी केली जात असून, वरळीतील आंबेडकर भवन येथे देखील मध्यरात्री 12 वाजता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन केलं. तसेच जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी झाले.

Ambedkar Jayanti Live Update Washim : बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने वाशीममध्ये आकर्षक रोषणाईची सजावट

Ambedkar Jayanti 2024 :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133व्या जयंती निमित्त वाशिम शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांच्या पुतळ्यावर शेकडो अनुयायीने त्यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात नतमस्तक होऊन अभिवादन करत आहे. यावेळी बाबासाहेब यांचा जन्मोत्सव साजरा केला जात आहे. यावेळी आकर्षक रोषणाईची सजावट देखील करण्यात आली आहे. 

Dr Ambedkar Jayanti 2024 : बुलढाणा जिल्ह्यातील विहिरीचे पाणी स्वतः बाबासाहेबांनी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जनतेला पाजलं

Ambedkar Jayanti  Live Update : 29 मे 1929 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत संत गाडगेबाबा,  तुकडोजी महाराज यांनी बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा या गावातील  विहिरीचे पाणी स्वतःच्या हाताने काढून अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जनतेला पाजलं होतं. तेव्हापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या विहिरीला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. एरवी राजकीय नेत्यांकडून नेहमीच दुर्लक्षित असलेली ही विहीर मात्र आज निवडणूक काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी चर्चेत आली आहे. या ठिकाणी राजकीय नेत्यांची मांदियाळी आज आपल्याला बघायला मिळणार आहे. 

Dr Ambedkar Jayanti 2024 : भुजबळ, भुसे यांच्यासह नेतेमंडळींकडून रात्री 12 वाजता बाबासाहेबांना अभिवादन

Ambedkar Jayanti  Live Update : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Dr Ambedkar Jayanti ) अभिवादन करण्यासाठी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि शेकडोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी नशिकमध्ये देखील पाहायला मिळत आहे. पालकमंत्री दादा भुसे, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उबाठा गटाचे उमेदवार राजभाऊ वाजे, धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मविआच्या उमेदवार डॉ शोभा बच्छाव यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी रात्री 12 वाजता अभिवादन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी आंबेडकर जयंती निमित्ताने बाबासाहेबच्या लंडन मधील बंगल्याचा देखावा साकारण्यात आला. 

Bhimrao Ambedkar : नागपूरच्या संविधान चौकात हजारो तरुणांचा जल्लोष

Dr Ambedkar Jayanti 2024:  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त नागपूरच्या संविधान चौकावर हजारो तरुणांनी जल्लोष करत मध्यरात्रीच बाबासाहेबांची जयंती साजरी केली. यावेळी तरुणांनी संविधान चौकावर बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन केले. त्यानंतर डीजेच्य तालावर रात्री दोन वाजेपर्यंत तरुणाई थिरकली. गेले काही वर्ष 13 आणि 14 एप्रिलच्या मध्यरात्री संविधान चौकात एकत्रित येऊन बाबासाहेबांच्या जयंतीचा जल्लोष करण्याची परंपरा निर्माण झाली आहे. त्याच मालिकेत काल रात्रीही हजारो तरुणांनी संविधान चौकावर बाबासाहेबांचा जयघोष करत जयंती जल्लोषात साजरी केली.

Bhimrao Ramji Ambedkar : वीस हजार वह्यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती; खास ड्रोन दृश्य

Dr Ambedkar Jayanti 2024 : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त बीडच्या गेवराई येथे वीस हजार वह्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांची भव्य प्रतिमा साकारण्यात आलीय. भीम ज्योती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकार उद्देश पघळ याने ही प्रतिमा साकारली आहे. गेवराईतील र.भ.अट्टल महाविद्यालय परिसरातील मैदानावर ही भव्य प्रतिमा साकारण्यात आली असून, गेवराईकर प्रतिमा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. आठ हजार स्केअर फुटामध्ये वीस हजार वह्यांपासून ही प्रतिमा लक्ष वेधून घेत आहे.

पार्श्वभूमी

Dr Ambedkar Jayanti 2024 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकरांची जयंती (Dr Ambedkar Jayanti 2024) दरवर्षी 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा संपूर्ण देश बाबासाहेबांची 134 वी जयंती साजरी केली जात आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.