एक्स्प्लोर

सांगली मिरज कुपवाड निवडणूक 2018: सांगलीकरांचा कौल कुणाला?

सांगली मिरज कुपवाड निवडणूक 2018 : सांगली-मिरज- कुपवाड महापालिकेच्या 78 जागांसाठी 1 ऑगस्टला मतदान होत आहे.

सांगली:  सांगली-मिरज- कुपवाड महापालिकेच्या 78 जागांसाठी 1 ऑगस्टला मतदान होत आहे. ही निवडणूक म्हणजे विधानसभेची रंगीत तालीमच ठरणार असल्याने, सर्वच पक्षांनी या निवडणुकीत आपली ताकद आजमवण्यास सुरुवात केली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. तर सांगली महापालिका वर्षांनुवर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. सारी गणिते लक्षात घेता ही महापालिकेची निवडणूक अटीतटीची होणार हे नक्की. सांगली महापालिकेसाठी सर्वच प्रभागात नाराज बंडखोर आणि अपक्ष आघाडी यांच्या उमेदवारांनी आपले अर्ज ठेवल्याने, राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. शिवाय आतापर्यंत शहरातील प्रश्न आक्रमक मांडणाऱ्या सांगली सुधार समितीने देखील या निवडणुकीत 15 उमेदवार उतरवले आहेत. यामुळे यंदा ही मनपाची निवडणूक बहुरंगी होणार आहे. प्रमुख पक्ष आणि उमेदवार- एकूण जागा 78 काँग्रेस - 45 राष्ट्रवादी - 32 भाजप – 77 शिवसेना -45 स्वाभिमानी विकास आघाडी - 9 सुधार समिती - 15 बहुरंगी लढत सांगली, मिरज, कुपवाड महापालिका स्थापन झाल्यापासून काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. अर्थात यामागे काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम, मदन पाटील यांचा मोलाचा वाटा राहिला होता. पण यंदाच्या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांनी महापालिकेवर झेंडा फडकवण्याचा निर्धार केला. वर्षांनुवर्षे राष्ट्रवादी-काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवणारी भाजपा यात पुढे आहे. राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केलेल्या शिवसेनेने देखील स्वबळाचा नारा देत दंड थोपटलेत. सांगली मिरज कुपवाड निवडणूक 2018: सांगलीकरांचा कौल कुणाला? शिवसेना स्वबळावर शिवसेना 51 जगांसह यंदा प्रथमच सांगली मनपाची निवडणूक स्वबळावर लढतेय. “सांगलीच्या विकासाचे ध्येय ज्याच्याकडे आहे, सांगली चांगली करण्यासाठी जे धडपडत आहेत, त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात अली असून, शिवसेनेचा महापालिकेवर भगवा फडकेल” असा विश्वास शिवसेना नेत्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत शिवसेनेलादेखील पक्षांतर्गत नाराजीचा सामना करावा लागला आहे. कारण शिवसेनेत नाराज असलेल्या एका गटाने स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून 9 उमेदवार उभे केलेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी राज्याबरोबरच महापालिकेतील राजकारण सांभाळणारे काँग्रेसचे दिवगंत नेते पतंगराव कदम आणि मदन पाटील यांच्या पश्चात ही महापालिकेची पहिलीच निवडणूक होतेय. त्यात भाजप या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरली आहे. याचाच धसका घेत काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्यापेक्षा आघाडीचा मार्ग स्वीकारला आहे. “धर्मनिरपेक्ष विचारांची फूट होणार नाही आणि एकसंघपणे या शहराच्या विकासाची काळजी घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगितलं. काँग्रेसचा पुन्हा एकदा महापालिकेवर झेंडा फडकेल आणि यात राष्ट्रवादी पक्षाची मोलाची साथ लाभेल असा विश्वास काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांना वाटतोय. यानिमित्ताने जिल्हा परिषदेवेळी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची चूक यावेळी जयंत-विश्वजित जोडगोळीने सुधारली आहे. तसेच जयंत पाटील यांची नुकतीच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्याक्षपदी निवड झाल्याने जयंत पाटील यांच्यासाठी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. पूर्ण ताकदीने भाजप मैदानात जिल्हा परिषदेचा ताबा मिळवल्यानंतर सांगली महापालिकेवर देखील भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरली आहे. भाजपने 20 प्रभागात 78 पैकी 77 उमेदवार जाहीर केले आहेत. मागील 20-22 वर्षांपासून काँग्रेस या महापालिकेत सत्तेत आहे. मात्र काँगेसने या शहराचा विकास दूरच या सांगलीचे खेडे बनवले असल्याचा आरोप केला आहे. याच बरोबर सांगलीचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी आम्हाला एकदा संधी द्या, सांगली , मिरज, कुपवाड महापालिका काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त करा अशी सादही भाजपच्या नेत्यांकडून घालण्यात आली आहे. तसेच या महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होईल असा दावाही भाजपचे नेते करत आहेत. सर्वच राजकीय पक्षांसाठी यंदाची ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असताना पक्षांकडून तिकीट न मिळाल्याची संख्यादेखील मोठी आहे. आतापर्यंत अशा एकूण 35 नाराजांना अपक्ष विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आधीच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच चालू असताना, आता या अपक्ष विकास आघाडीमुळे मतांमध्ये आणखी विभाजन होण्याची दाट शक्यता आहे, जी राजकीय पक्षासाठी आणखी एक मोठी डोकेदुखी ठरु शकते. सांगली महापालिका निवडणुकीतील ठळक मुद्दे - जिल्ह्यात वाढत चाललेली भाजपची ताकद रोखण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुकीत आघाडी - भाजप - शिवसेनेचा मात्र सवतासुभा कायम , दोन्ही पक्ष ही निवडणूक स्वतंत्रपणे लढत आहेत. - जिल्हा परिषदेवर ताबा मिळवल्यानंतर महापालिकादेखील ताब्यात घेण्याचा भाजपचा आटोकाट प्रयत्न - राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्यानंतर त्याच्या होम ग्राऊंडवर पहिलीच निवडणूक असल्याने प्रतिष्ठा पणाला - कै. पतंगराव कदम, कै. मदन पाटील यांच्या पश्चात्य वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसची ही पहिलीच निवडणूक - एकूण 78 पैकी 40 जागांवर काँग्रेस तर 29 जागांवर राष्ट्रवादी लढणार - 5 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आणि 4 ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार देणार - भाजपने 20 प्रभागात 78 पैकी 77 उमेदवार जाहीर केले - शिवसेनेने 78 पैकी 52 ठिकाणी उमेदवार उभे केलेत - सांगली जिल्हा सुधार समिती  15 जागांवर निवडणूक लढवणार प्रमुख पक्ष आणि उमेदवार- एकूण जागा 78 काँग्रेस - 45 राष्ट्रवादी - 32 भाजप – 77 शिवसेना -45 स्वाभिमानी विकास आघाडी - 9 सुधार समिती - 15

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget