एक्स्प्लोर

संघर्षकन्यांसाठी 'माहेर'ची माणसं, अलका कुबल मदतीला

उस्मानाबाद : आई-वडिलांच्या पश्चात घराची जबाबदारी सांभाळत शिक्षण नेटाने सुरु ठेवणाऱ्या उस्मानाबादच्या संघर्षकन्यांना सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनीही या बहिणींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.     निकीता आणि पूजा या बहिणींचं शिक्षण जोपर्यंत सुरु राहिल तोपर्यंत प्रत्येक वर्षीच्या दोघींच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी अलका कुबल यांनी उचलली आहे. निकीता दहावीत, तर पूजा आठवीत शिकत आहे.     निकिता 4 वर्षांची असताना वडिलांचं अपघाती निधन झालं. कणखर आईनं दोन्ही लेकींसोबत आई-वडिलांचं घर गाठलं. मोलमजुरी करुन घर चालत होतं. पण तितक्यात नियतीनं दुसरा धक्का दिला. निकिता आठवीत असताना त्यांची आईही गेली.

परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या उस्मानाबादच्या संघर्षकन्या

    बहिणीसह घराची जबाबदारी निकीतावर आली. पण अवघ्या 13 व्या वर्षी निकितानं मोठा निर्णय घेतला. आधीच परिस्थितीशी झुंजणाऱ्या आजी-आजोबांवर ओझं न होण्याचा. या निर्णयासरशी निकितानं आपलं मूळ घर गाठलं. हा मोठा निर्णय निभावताना निकिताला छोट्या बहिणीच्या शिक्षणाची आबाळ करायची नव्हती. त्यामुळे घरातलं प्रत्येक काम निकितानं आपल्या अंगावर घेतलं आहे.     बहिणीला शाळेत सोडून परतलेली निकिता  पुन्हा कामं आवरुन आपल्या शाळेत जाते. दिवसभर शाळा... तीही आठवड्यातले तीन दिवस... उरलेले चार दिवस ती शेतात राबते. मजुरी करण्यापासून निकितानं बहिणीला दूर ठेवलं. वह्या पुस्तकं हातात धरायच्या वयात पोरीनं खुरपं जवळ केलं. मजुरीमुळे शाळेत खाडे पडू लागले. तिला शाळेतून काढणार असल्याचं शिक्षकांनी ठरवलं, पण पुढे परिस्थिती समजली आणि त्यांनी निर्णयापासून माघार घेतली.     निकिता मितभाषी आहे, पण पोरीला शिकायची उर्मी आहे. आयुष्यानं दुर्दैवाचं इतकं दान पारड्यात टाकलं. सुदैवाने तिला मैत्रिणी चांगल्या मिळाल्या. मैत्रिणी तिला गृहपाठाच्या वह्या देऊन मदत करतात.     नियतीनं अजाणत्या वयापासूनच या पोरांची परीक्षा पहायचं ठरवलं. नियती आपल्या पायात काटे पेरत आहे, याचं भानही या पोरांना नाही. ते फक्त वाट तुडवत आहेत. नव्या प्रकाशाच्या दिशेनं.

महत्त्वाच्या बातम्या

ऊस दराचा तिढा कायम! साखर कारखानदार 3150 वर ठाम, शेतकरी संघटनेची भूमिका काय? बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?  
ऊस दराचा तिढा कायम! साखर कारखानदार 3150 वर ठाम, शेतकरी संघटनेची भूमिका काय? बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?  
काही लोकांनी खूप मोठ्या बैठका घेतल्या, जिल्हाभर फिरुन निवडून लढवण्याची तयारी केली, पण... जयकुमार गोरेंचा नाव न घेता मोहिते पाटलांना टोला
काही लोकांनी खूप मोठ्या बैठका घेतल्या, जिल्हाभर फिरुन निवडून लढवण्याची तयारी केली, पण... जयकुमार गोरेंचा नाव न घेता मोहिते पाटलांना टोला
सत्ताधारी शेतकऱ्यांना उध्वस्त करतायेत, फायनान्सवाले आले तर पैसे नाहीत म्हणायचं, जरांगे पाटलांचा हल्लाबोल
सत्ताधारी शेतकऱ्यांना उध्वस्त करतायेत, फायनान्सवाले आले तर पैसे नाहीत म्हणायचं, जरांगे पाटलांचा हल्लाबोल
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget