एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
चंद्रपुरात पावणेपाच फुटांचा पांढरा नाग आढळला!
जुनोना येथे पकडण्यात आलेला नाग हा अंदाजे पावणे पाच फूट असून पूर्णपणे तंदरुस्त आहे.
![चंद्रपुरात पावणेपाच फुटांचा पांढरा नाग आढळला! Albino Cobra Found In Junona In Chandrapur Latest Updates चंद्रपुरात पावणेपाच फुटांचा पांढरा नाग आढळला!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/28084508/White-Cobra-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातल्या जुनोना गावात अत्यंत दुर्मिळ पांढरा नाग म्हणजेच अल्बिनो कोब्रा (Albino Cobra) आढळला आहे.
जुनोना हे गाव जंगलाला लागून असून शुक्रवारी रात्री विलास आलाम यांच्या घरी एक नाग दडून बसल्याचे दिसून आले. त्यांनी याच गावातील काही सर्पमित्रांना याची माहिती दिली.
सर्पमित्रांनी हा नाग जेव्हा बाहेर काढण्यात आला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण हा नाग पांढऱ्या रंगाचा होता.
विशेष म्हणजे हा नाग दुर्मिळ असण्यासोबतच दिसायला अतिशय सुंदर आणि पांढरा शुभ्र असतो. पांढरा नाग किंवा अल्बिनो कोब्रा ही वेगळी प्रजाती नसून नागाच्या डीएनएमध्ये बदल झाल्यामुळे नागाचा संपूर्ण रंग पांढरा दिसतो.
विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच हा पांढरा नाग आढळला आहे.
जुनोना येथे पकडण्यात आलेला नाग हा अंदाजे पावणे पाच फूट असून पूर्णपणे तंदरुस्त आहे. जुनोना येथील वनविभाग कार्यालयात या नागाची नोंद करण्यात आली असून त्याला जुनोना येथील त्याच्या प्राकृतिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
पुणे
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion