एक्स्प्लोर
2 हजाराची नवी नोट आणून काय साध्य केलं?: अजित पवार

पिंपरी-चिंचवड: पंतप्रधान मोदींनी 500 आणि एक हजाराची नोट रद्द करुन चांगला निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी व्यक्त केली आहे. मात्र, 2 हजाराची नवी नोट आणून काय साध्य केलं जाणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसेल अशी वक्तव्य करणाऱ्यांवर त्यांनी चांगलीच तोफ डागली. काहीही घडलं की राष्ट्रवादी काँग्रेसवर थोपविण्याचा केविलवाणा प्रयत्न अशोभनीय असल्याचा पवार म्हणाले. मोदींच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका का केली जाती आहे? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. 'प्रत्येक वेळी काहीही घडलं की ते राष्टवादीवर आणून थोपविण्याचा प्रयत्न केला जातो.' असं म्हणत त्यांनी टीकाकरांना उत्तर दिलं आहे.
Before You Go
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















