एक्स्प्लोर

जे झालं ते झालं, आता नवी सुरुवात करायची : अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत अजित पवार यांनी सर्वांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. अजित पवार म्हणाले की, जे झालं ते झालं. ते संपलंय आता. आता नवीन सुरुवात करायची आहे. पक्षासाठी जोमाने काम करायचं.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन परत स्वगृही परतले आहेत. आता ते पुन्हा राष्ट्रवादीत सक्रीय झाले आहेत. काही वेळाने ते महाविकास आघाडीच्या बैठकांमध्येदेखील सहभागी होतील. उद्या (28 नोव्हेंबर) महाविकास आघाडीचे नेते मंत्रीमंडळाची शपथ घेणार आहेत. यावेळी अजित पवार यांना मंत्रीपद मिळणार का? असे प्रश्न सर्वांना पडले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीतही अजित पवारांना याबद्दल विचारण्यात आले. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, माझ्या मंत्रीपदाचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यावळी आमदारांनी अजित पवारांना विचारले की, तुम्ही मंत्री होणार का? त्यावर अजित पवार म्हणाले की, त्याबद्दलचा निर्णय पवारसाहेब घेतील. यावेळी अजित पवार यांनी सर्वांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. अजित पवार म्हणाले की, जे झालं ते झालं. ते संपलंय आता. आता नवीन सुरुवात करायची आहे. पक्षासाठी जोमाने काम करायचं. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच वाढलेला असताना भाजपने आपण सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याचदरम्यान अचानक अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत बंडखोरी करुन भाजपशी हातमिळवणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सोबत नेले. अजित पवारांच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षाने राज्यात सत्तास्थापन केली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तीनच दिवसात अजित पवार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि स्वगृही परतले आहेत. अजित पवारांनी फडणवीस सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे ते सरकार पडलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी राज्यात सत्तास्थापन करणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात अजित पवारांना संधी मिळणार का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. स्वगृही परतल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया पाहा अजित पवारांना मंत्रीपद मिळणार का? जयंत पाटलांना काय वाटतं? वाचा : अजित पवार उपमुख्यमंत्री व्हावेत ही राष्ट्रवादीच्या आमदारांची इच्छा

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Tukaram Mundhe : विद्यार्थ्यांचा पोषण आहार सकस आणि दर्जेदारच हवा, तुकाराम मुंढेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला!
विद्यार्थ्यांचा पोषण आहार सकस आणि दर्जेदारच हवा, तुकाराम मुंढेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला!
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
Parth Pawar Kayinaat Dara Marriage : पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!

Embed widget