एक्स्प्लोर
गांडुळाची उपमा शिवसेनेला झोंबल्याने पोटातलं बाहेर : अजित पवार
शिवसेनेला दिलेली गांडुळाची उपमा इतकी झोंबली, की त्यांच्या पोटातील सगळं बाहेर पडलं, असं अजित पवार म्हणाले
सांगली : शिवसेनेला मी दिलेली गांडुळाची उपमा त्यांना इतकी लागली, की त्यांच्या पोटातील सगळं बाहेर पडलं, या शब्दात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी 'सामना'तून झालेल्या टीकेवर उत्तर दिलं.
शिवसेनेला दिलेली गांडुळाची उपमा इतकी झोंबली, की त्यांच्या पोटातील सगळं बाहेर पडलं. आता त्यांचं खरं, की माझं, याचा निर्णय जनताच घेईल, असंही अजित पवार म्हणाले.
स्वतःचं अपयश झाकण्यासाठी आणि अजित पवार यांनी शिवसेनेचं खरं स्वरुप उघड केल्यामुळे शिवसेनेचा तीळपापड झाला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे सरकारला नालायक म्हणतात, पण याच सरकारमध्ये शिवसेनेचे 12 मंत्री आहेत, हाच शिवसेनेचा दुटप्पीपणा आहे, असंही तटकरे म्हणाले.
अजित पवार यांनी शिवसेनेची तुलना गांडुळाशी केल्यानंतर शिवसेनेने ‘सामना’तून त्यांच्यावर पलटवार केला.
शरद पवारांनी जे कमावले ते अजित पवारांनी अल्पावधीतच गमावले. त्यामुळेच 75 व्या वर्षातसुद्धा पक्षबांधणीसाठी पवारांना वणवण करावी लागत असल्याची टीका, सामनातून करण्यात आली आहे.
आम्हाला गांडूळ म्हणणाऱ्यांना दुतोंडी साप म्हणणे हा त्या सापाचाही अपमान ठरेल. म्हणून तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असंच म्हणावं लागेल, असा हल्ला शिवसेनेने चढवला आहे.
अजित पवारांवर 'सामना'मध्ये जहरी टीका
दरम्यान, भाजपचं सरकार आल्यापासून कुठल्या चहापानाला विरोधक गेले हे दाखवून द्या, असं आव्हान अजित पवार यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना दिलं आहे. विरोधकही चहामधील वाटेकरी असल्याचा दावा सुभाष देशमुखांनी केला होता. आम्हाला डल्लामार म्हणणाऱ्यांनीच सोलापूरमध्ये महापालिकेच्या जागेवर बंगला बांधून डल्ला मारला, असं अजित पवार म्हणाले.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement