पुणे : सध्या राजकारणात सगळीकडे राष्ट्रवादीच्या फुटीची (Ajit Pawar)  चर्चा सुरु आहे. अजित पवार आमचेच नेते आहेत, असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालंय. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. नो कॉमेंट्स एवढंच अजितदादा म्हणाले. 'आरोप-प्रत्यारोपांना महत्त्व न देता कामानं उत्तरं द्यायचं ठरवलंय, असे अजित पवार म्हणाले. 


विकास करणं माझं पॅशन...


सत्तांतर झालं त्याला बरेच दिवस झाले. त्यानंतर अमित शाहांच्या उपस्थित कार्यक्रमात मी आलो होतो. पण पिंपरी चिंचवडचे स्थानिक पदाधिकारी म्हणाले, दादा तुम्ही लवकर या, म्हणून आज आलो. मला विकास कामांमध्ये लक्ष घालायला आणि विकास करायला मला आवडतं. ते माझं पॅशन आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


माझं चुकलं मी दिलगिरी व्यक्त करतो...


चांद्रयान-3 या मोहीमेतंर्गत चंद्रावर यान उतरवणाऱ्या देशांच्या यादीत भारत अग्रस्थान आहे. त्यावेळी बोलताना माझ्या तोंडून चांद्रयान या ऐवजी चंद्रकांत झालं. पण त्यावर सगळे हसू लागले. माझं चुकलं मी दिलगिरी व्यक्त करतो. चांद्रयान-3 मध्ये वालचंदनगरने महत्वाची भूमिका बजावली. जगभरातील वैज्ञानिकांना याचा संशोधनासाठी फायदा होणार आहे. या मोहीम भारत शक्तिशाली देशांच्या यादीत जाऊन बसला आहे. मला खुप मोठा अभिमान आहे, असं म्हणत त्यांनी इस्त्रोचं कौतुक केलं आहे. 


पुन्हा एकदा मोदींचं कौतुक...


पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळं आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही टॉप पाचमध्ये आहे. आता टॉप तीनमध्ये अर्थव्यवस्था आणायचं उद्दीष्ट आहे. आर्थिक राजधानी असणारी महाराष्ट्राचंसुद्धा यात योगदान देत आहे. बाकीच्या आरोप प्रत्यारोपांना महत्व न देता आम्ही कामाने उत्तरं द्यायचं ठरवलं असल्याचं म्हणत मोदींच्या कामाचं पुन्हा एकदा कौतुक केलं आहे. 


चुकीच्या बातम्या पसरवू नका...


आपल्या तळेगावमध्ये जनरल मोटर्सचा उद्योग बंद पडला. तिथे ह्युंडाई कंपनी आणायचे प्रयत्न सुरु आहेत. काही जण बातम्या पसरवतात की मुख्यमंत्र्यांच्या जबाबदारीच्या विभागांची माहिती घेतली. पण आम्ही एकमेकांना विश्वासात घेऊन हे करत आहोत. उगाच नको त्या बातम्या पसरवू नका, असं म्हणत त्यांनी चांगलंच खडसावलं आहे. 


पाणी प्रश्नाबाबत काय म्हणाले?


पुणे शहराला जसं पाणी कमी पडतंय. तशीच अवस्था भविष्यात पिंपरी चिंचवडमध्ये होऊ शकते.  शहराच्या आजूबाजूच्या परिसरात जी धरणं आहेत. त्यांचं पाणी वीजनिर्मितीसाठी वापरलं जातं. ते पाणी पिंपरी चिंचवडला द्यावं, यासाठी चर्चा करणार आहे. ते केल्याशिवाय भविष्यातील पाण्याचा प्रश्न मिटणार नाही. लोणावळ्याच्या पलीकडे पडणाऱ्या पावसाचे पाणी कोकणात जातं. ते तिथंच साठवून, पंपिंग करून ते शहराकडे घेता येईल. पुढच्या पंधरा वीस वर्षांसाठी ही कामं करणं गरजेचे आहे, असल्याचं ते म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :