पुणे : पुण्यातील कोयता गँगची दहशत (Pune Koyta gang)संपायचं नाव घेत नाही आहे. आज पुन्हा एकदा पुण्यातील हडपसरच्या म्हाडा वसाहतीत कोयता टोळीचा राडा पाहायला मिळाला. कॉलेजमधील झालेल्या किरकोळ वादानंतर कोयता टोळीच्या आठ ते दहा जणांनी हातात कोयते घेऊन हडपसर गोसावी वस्ती परिसरात धुमाकूळ घालत तरुणावर कोयत्याने हल्ला केला.
हल्ल्यात मिलिंद मधुकर कांबळे वय 23हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हडपसर परिसरात असलेल्या एका नामांकित कॉलेजमध्ये अल्पवयीन टोळके आणि मिलिंद यांच्यात वाद झाला होता. वादानंतर टोळक्याने हातात कोयते घेत मिलिंद राहत असलेल्या परिसरात येऊन हल्ला केल्याने परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.
काही दिवसांपूर्वी तलवारीने दहशत निर्माण करून डोंगरात लपल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र या दहशत माजवणाऱ्या डोंगरात लपून बसला असतानाही पुणे पोलिसांनी हेरलं आणि त्याला अटक केली होती. पुण्यातील कोथरूड परिसरात दहशत पसरवत होता. ओंकार कुडले असं पुण्यातील कोथरूड परिसरात दहशत पसरविणाऱ्या तरुणाचं नाव होतं. बॅनरवर फोटो न लावल्यामुळे कोथरूड परिसरात तलवार फिरवत दहशत पसरवली होती.
कोयता गँग दहशत कायम...
पुण्यात मोठ्या प्रमाणात कोयता गँग दहशत माजवताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनीदेखील आता त्यांच्याविरोधात अॅक्शन प्लॅन आखला आहे. पोलीस या टोळीने जिथे दहशत माजवली त्यात परिसरात घेऊन जात त्यांची नागरिकांसमोरच रस्त्यावर वरात काढताना दिसत आहे. पुणे पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवायला देखील सुरुवात केली आहे. त्यामार्फत अनेक गुन्हेगारांचा शोध घेणं सुरु आहे. आतापर्यंत किमान सात ते आठ वेळा कोयगा गँगची भररस्त्यात धिंड काढली आहे. तसेच यापुढेही या टोळीची धिंड काढण्यात येणार आहे. या टोळीत अल्पवयीन मुलांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
पोलिसांकडून उपाययोजना
कोयता गँगने पुणे पोलिसांना पळता भुई सोडली आहे. रोज हल्ले, केक कापणं यात धिंड काढल्यानंतर आता पुणे पोलिसांनी आता DB ब्रांच आणि बिट मार्शलला पिस्तुल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या सगळ्या खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असं असलं तरीही कोयता गँगला रोखणं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. या सगळ्यांना प्रशिक्षण दिल्यावर शहरातील गुन्हेगारी कमी होईल का?, कोयता गँगला आळा बसेल का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-