Maharashtra NCP Political Crisis LIVE : अनिल पाटील यांची अजित पवार गटाच्या प्रतोदपदी निवड
Maharashtra NCP Crisis : महाराष्ट्राच्या राजकारण अभूतपूर्व परिस्थिती ओढावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला. अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
Sunil Tatkare : सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अजित पवार घोषणा करणार आहेत. थोड्याच वेळात अजित पवार अधिकृत घोषणा करणार आहे. देवगिरीवर झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. पक्ष पातळीवरती पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी अजित पवारांनी सुरुवात केली आहे.
Maharashtra NCP Crisis : अनिल पाटील यांची अजित पवार गटाच्या प्रतोदपदी निवड झाली आहे. खुद्द अनिल पाटील यांनी एबीपी माझाला माहिती दिली. अनिल पाटील यांनी कालच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवारांना भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा शब्द
अजित पवार यांच्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही
काँग्रसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
शरद पवार यांच्या स्वागतासाठी पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यात हजर
Maharashtra NCP Crisis : अजित पवार यांच्या समर्थनात आत्तापर्यंत 35 आमदारांनी सह्या केल्या : सूत्र
आज एकूण 42 आमदार अजित पवार यांना पाठिंबा दर्शवणार
अनेक आमदारांना शपथविधी बाबत माहिती नसल्याने आज आमदारांच्या सह्या पार पडणार
10 वाजताच्या बैठकीत पाठींबा देणारे आमदार उपस्थीत रहाणार
देवगिरी निवासस्थानी 10 वाजता बैठक
Rupali Chakankar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी रात्री अजित पवार यांची देवगिरी या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रुपाली चाकणकर कोणासोबत जाणार याबाबत त्यांनी आतापर्यंत भूमिका स्पष्ट केली नाही
मात्र रात्री अजित पवारांची भेट घेतल्याने त्या अजित दादांसोबत जाणार असल्याची चर्चा आहे.
Maharashtra NCP Crisis : अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदी झालेला शपथविधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांचा मंत्री म्हणून झालेल्या शपथविधीमुळे शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा होतेय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे सर्व आमदार, मंत्री, खासदारांची आज बैठक बोलावलीय. सर्व आमदारांना त्यांनी तातडाने बोलावून घेतलंय. तत्पूर्वी शिंदे त्यांच्या नेत्यांसह बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन करतील. त्यानंतर चार वाजता बाळासाहेब भवनमध्ये त्यांनी बैठक होईल.
Maharashtra Political Crisis : अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना राज्यभरात पोस्टर लावताना शरद पवार यांचा फोटो लावण्याचे आदेश : सूत्र
शरद पवार यांच्या नेतृत्वातीलच राष्ट्रवादी भाजप सोबत गेल्याच अजित पवार यांच्या गटाकडून दावा
आज सकाळी 10 वाजता देवगिरी बंगल्यावर शपथ घेतलेल्या आमदारांची बैठक
बैठकीला पाठींबा देणारे आमदार देखील उपस्थित राहणार
आदी बंडाचा प्रयत्न केला त्यावेळीं 4 आमदार वगळता इतर सर्व आमदारांची भाजपसोबत जाण्याची इच्छां असल्यामुळे निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती
त्यावेळी भाजप सोबत जाण्यासाठी तयार नसल्याने सही न करणाऱ्या आमदारांमध्ये रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि प्राजक्त तनपुरे यांचा समावेश
Maharashtra NCP Crisis: उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जून 2022 मध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षाच्या घटनेत बदल केले होते. पक्षासंदर्भातले निर्णय घेण्याचा अधिकार केवळ राष्ट्रीय समितीला आहे, राज्य पातळीवरचे नेते हा निर्णय घेऊ शकत नाहीत, असा महत्त्वाचा क्ल़ॉज पक्षघटनेत घालण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, पक्ष विसर्जित करण्याचा किंवा पक्षाचे इतर कोणत्याही पक्षात विलीनीकरण करण्याच्या अधिकार केवळ राष्ट्रीय समितीला आहे, आणि तसं करायचं असेल तर राष्ट्रीय समितीची बैठक बोलवावी लागेल, आणि सर्व सदस्यांना या बैठकीबाबत एक महिनाआधी नोटीस देणं बंधनकारक आहे.
Ajit Pawar PC : "आज आम्ही एक निर्णय घेऊ, शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. तशी आम्ही शपथ घेतली, विस्तार होणार आहे. इतर सहकारी मित्रांना संधी देण्याचा प्रयत्न असेल. या संदर्भात अनेक चर्चा सुरु होतील. वरिष्ठ पातळीवर चर्चा होत होती. सर्वांचा विचार करत विकासाला महत्त्वं दिले पाहिजे. मागील 9 वर्षात कारभार चालला आहे तसा चांगला प्रयत्न मोदी साहेब करत आहेत. त्या भूमिकेला आपण पाठिंबा दिला पाहिजे. विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रश्न आहे. विरोधी पक्षातून आऊटपूट काही निघत नाही. देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. मी वर्धापन दिनी स्पष्ट भूमिका मांडली होती. तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. नवीन कार्यकर्ते पुढे आणले गेले पाहिजे, तसा प्रयत्न माझा राहणार आहे. कोरोना होता तरी विकास ही आमची भूमिका होती. आपण कामाशी मतलब ठेवतो. केंद्रीय निधी राज्याला कसा मिळेल यासंदर्भात पुढाकार घेऊ. हा निर्णय घेताना बहुतेक आमदारांना हा निर्णय मान्य आहे. एनसीपी म्हणून आम्ही सामील झालोय. पुढे देखील निवडणुका पक्ष चिन्हासोबतच लढवणार आहोत," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी शपथविधीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
Ashok Chavan on Maharashtra Politics : शिंदे-फडवणीस सरकार अस्थिर असल्यामुळेच भाजपला फोडाफोडीचे राजकारण करावे लागतंय अशी प्रतिक्रिया आजच्या राजकीय घडामोडीवर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आपलं उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं असून काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी कायम राहिल, असा विश्वास आपण त्यांना दिल्याचे चव्हाण म्हणाले. चव्हाण हे नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल शपथविधीला उपस्थित होते.
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. विधानसभा उपाध्यक्ष, पक्ष प्रतोद अजित पवार यांच्या पाठिशी आहेत.
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अदिती तटकरे यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. अदिती तटकरे या सरकारमधील पहिल्या आणि एकमेव महिला मंत्री ठरल्या आहेत.
Ajit Pawar Maharashtra Politics : अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांना 54 पैकी 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचं समजतं. या आमदारांनी सरकारला पाठिंब्याचं पत्र दिल आहे. त्यामुळे अजित पवार यांचाच राष्ट्रवादी पक्षावर दावा असेल, त्यांचा गटच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अस चर्चा आहे
Maharashtra Politics : अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार समर्थकांनी जल्लोष केला. लोकहितासाठी दादांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याची भावना स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
Ajit Pawar : अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
Maharastra Politics : कोण कोण घेणार शपथ? संभाव्य यादी खालीलप्रमाणे...
Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 पैकी 40 आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
Maharashtra Political Crisis LIVE : राजभवनात शपथविधीची जय्यत तयारी सुरु आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा थोड्या वेळात शपथविधी पार पडणार आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीचे आठ मंत्री असणार आहेत. त्यामध्ये छगन भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे यांच्या नावाचा समावेश आहे.
अजित पवार
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
अदिती तटकरे
अनिल भाईदास पाटील
बाबुराव अत्राम
संजय बनसोडे
Ajit Pawar : अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. अजित पवार यांच्या शपथविधीची जय्यत तयारी सुरु असून याचा फोटो एबीपी माझाच्या हाती लागला आहे.
पार्श्वभूमी
Ajit Pawar Maharashtra Political Crisis LIVE : महाराष्ट्राच्या राजकारण (Maharashtra Politics) अभूतपूर्व परिस्थिती ओढावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -