एक्स्प्लोर

सिंचन घोटाळा : विरोधक आक्रमक झाल्याने सरकारचे राजकारण : मुंडे

सिंचन घोटाळा प्रकरणास अजित पवार जबाबदार नाहीत, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.

मुंबई :  सिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) न्यायालयासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. परंतु विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मात्र अजित पवार यांची पाठराखण केली आहे. मुंडे म्हणाले की, एसीबीने सादर केलेल्या शपथपत्राचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे. धनंजय मुंडे म्हणाले की, "शपथपत्रात कुठेही अजित पवार यांच्यावर ठपका ठेवलेला नाही. शपथपत्राचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. अजित दादांनी कधीही अधिकार किंवा नियम डावलून मंजुरी दिली नाही. सचिवांनी ज्या फाईल पवारांसमोर ठेवल्या त्यावर त्यांनी सह्या केल्या, या प्रकरणाला मंत्री जबाबदार नाहीत." मुंडे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी याप्रकरणी माध्यमांनादेखील दोषी ठरवले आहे. ते म्हणाले की, "माध्यमांनीदेखील प्रतिज्ञापत्राचा चुकीचा अर्थ काढला आहे. मागच्या वेळीदेखील मीडियाने दाखवले की, तटकरे आणि अजित पवार यांचे नाव सिंचन घोटाळ्यात आहे. त्यामुळे माध्यमांना विनंती करतो की प्रतिज्ञापत्र नीट वाचायला हवे. विरोधक आक्रमक झाल्यामुळे सरकार हे राजकारण करत आहे." अजित पवारांवर कोणते आरोप आहेत? सिंचन प्रकल्पाचा निधी वाढवणे, नियमांचा भंग करणे, असा ठपका अजित पवारांवर ठेवण्यात आला आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 27 पानांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामध्ये अजित पवार हे सिंचन घोटाळ्यासाठी जबाबदार असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. ठेका देण्याचे पूर्वनियोजित षड:यंत्र रचणे, प्रकल्पाची किंमत वाढवणे, नियमांचे उल्लंघन करणे, राज्याला प्रचंड नुकसान पोहचवणे असा ठपका एसीबीने अजित पवारांवर ठेवण्यात आला आहे. वाचा : सिंचन घोटाळ्यासाठी अजित पवार जबाबदार, एसीबीचं प्रतिज्ञापत्र

         : सिंचन घोटाळा : सरकारची कारवाई सूडबुद्धीने नाही तर नियमाने : महाजन

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget