एक्स्प्लोर

Ajit Pawar on Corona Restrictions : कोरोनाचे नियम लवकरच शिथिल करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती 

Ajit Pawar on Corona Restrictions : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून राज्यातील कोरोनाचे नियम लवकरच शिथिल करणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Ajit Pawar on Corona Restrictions : पुण्यातील कोरोना परिस्थिती आता आटोक्यात आली आहे. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट 15 टक्के असून राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट  9 टक्के. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून राज्यातील कोरोनाचे नियम लवकरच शिथिल करणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर आपली बाजू मांडली. ते म्हणाले, "शिवजयंती साजरी  करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून नियमात शिथिलता आणणार आहे. 19 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मी आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहोत" प्रवास करण्यास मनाई असल्यामुळे मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. 

"कोवॅक्सिन लसीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे 15 ते 18 वयोगटालीत लसीकरणाचा वेग सध्या मंदावला आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्रासोबत चर्चा करणार आहे. त्याचबरोबर सध्या थिएटरमधे 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास परवानगी आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांशी बोलून यामधेही शिथिलता आणणार आहे. 

किरीट सोमय्या यांच्या आरोपांना उत्तर 

पुण्यातील कोविड सेंटरमध्ये कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार झाला असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या आरोपांना अजित पवार यांनी यावेळी उत्तर दिले. "पुण्यात एक आणि पिंपरी-चिंचवडमधे एक अशी दोन जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आली होती. या दोन्ही कोविड सेंटरची कामं पारदर्शीपणे केली आहेत. शिवाय दोन्ही कोविड सेंटरमध्ये कोणत्याही राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप नव्हता. कोविड सेंटरची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर होती. मात्र, या जम्बो कोवीड सेंटरबाबत आरोप होत असल्याने आयुक्तांना याबाबत नोट काढण्यास सांगितले आहे. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधे कोणतीही चुकीची गोष्ट झालेली नाही, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.  

"धुक्यामुळे यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. तो आता सुरळीत झाला आहे, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.  

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Torrent Power Karjat Project : कर्जतचा प्रकल्प हा पर्यावरणपूरकच, विरोधकांचे फेक नरेटिव्ह म्हणजे महाराष्ट्रविरोधी धोरण; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
कर्जतचा प्रकल्प हा पर्यावरणपूरकच, विरोधकांचे फेक नरेटिव्ह म्हणजे महाराष्ट्रविरोधी धोरण; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
Prataprao Jadhav: एकनाथ शिंदेंचा गळा इतका नाजूक नाही की कुणी केसाने कापेल; जे काही चाललंय ते चांगलं नाही; राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा हल्लाबोल, भाजपलाही सुनावलं!
एकनाथ शिंदेंचा गळा इतका नाजूक नाही की कुणी केसाने कापेल; जे काही चाललंय ते चांगलं नाही; राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा हल्लाबोल, भाजपलाही सुनावलं!
जर फडणवीस साहेब त्यांना वाचवत असतील, तर फडणवीस साहेबच हे करत होते का? सत्तेत राहायचं म्हणून एकमेकांना वाचवत आहात का? मनोज जरांगे पाटलांची विचारणा
जर फडणवीस साहेब त्यांना वाचवत असतील, तर फडणवीस साहेबच हे करत होते का? सत्तेत राहायचं म्हणून एकमेकांना वाचवत आहात का? मनोज जरांगे पाटलांची विचारणा
Sandeep Deshpande: कर्जत, भीभाशंकरमधील झाडांच्या कत्तलींची राज ठाकरे पाहणी करणार, नागरिकांनी शिवतीर्थावर घेतली भेट; तोफ सुद्धा धडाडणार
कर्जत, भीभाशंकरमधील झाडांच्या कत्तलींची राज ठाकरे पाहणी करणार, नागरिकांनी शिवतीर्थावर घेतली भेट; तोफ सुद्धा धडाडणार

व्हिडीओ

Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump: अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
Accident News: न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलानं घरातून गाडी नेली; मध्यरात्रीच्या सुमारास दिली दुचाकीस्वाराला दिली धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलानं घरातून गाडी नेली; मध्यरात्रीच्या सुमारास दिली दुचाकीस्वाराला दिली धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
NZ vs IND T20 : सलग दोन पराभवांनंतर न्यूझीलंडचा मोठा निर्णय! 'हा' खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर, टीम इंडियाशी लढण्यासाठी संघात मोठे बदल
सलग दोन पराभवांनंतर न्यूझीलंडचा मोठा निर्णय! 'हा' खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर, टीम इंडियाशी लढण्यासाठी संघात मोठे बदल
Beed Crime News: हॉटेल मालकासह त्याच्या भावाचाही त्रास; पैशांवरून शिवीगाळ, आर्थिक अन् मानसिक छळ, मॅनेजरनं कामाच्या ठिकाणीच गळ्याला लावली दोर; बीडमधील घटना
हॉटेल मालकासह त्याच्या भावाचाही त्रास; पैशांवरून शिवीगाळ, आर्थिक अन् मानसिक छळ, मॅनेजरनं कामाच्या ठिकाणीच गळ्याला लावली दोर; बीडमधील घटना
Raju Shetti: '4500 पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही..' स्वाभिमानीची राजू शेट्टींच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्ह्यात विराट मोटरसायकल रॅली
'4500 पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही..' स्वाभिमानीची राजू शेट्टींच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्ह्यात विराट मोटरसायकल रॅली
Pune Crime News: चारित्र्यावर संशय; नवऱ्यानं औषधामधून ब्लेडचे तुकडे खायला घातले; बायकोनं जबाब बदलला पण..., कोर्टानं दिली सात वर्षे सक्तमजुरीच्या शिक्षेसह, 70 हजारांचा दंड, नेमकं काय प्रकरण?
चारित्र्यावर संशय; नवऱ्यानं औषधामधून ब्लेडचे तुकडे खायला घातले; बायकोनं जबाब बदलला पण..., कोर्टानं दिली सात वर्षे सक्तमजुरीच्या शिक्षेसह, 70 हजारांचा दंड, नेमकं काय प्रकरण?
जर फडणवीस साहेब त्यांना वाचवत असतील, तर फडणवीस साहेबच हे करत होते का? सत्तेत राहायचं म्हणून एकमेकांना वाचवत आहात का? मनोज जरांगे पाटलांची विचारणा
जर फडणवीस साहेब त्यांना वाचवत असतील, तर फडणवीस साहेबच हे करत होते का? सत्तेत राहायचं म्हणून एकमेकांना वाचवत आहात का? मनोज जरांगे पाटलांची विचारणा
Rahul Gandhi: 'चलो दिल्ली, आमची मतं चोरताहेत, आम्ही मुकाट्याने सहन करणार नाही..' राहुल गांधींनी रामलीला मैदानातील रॅलीचा हुंकार भरला, पण भाजपचे मनःपूर्वक आभार का मानले?
'चलो दिल्ली, आमची मतं चोरताहेत, आम्ही मुकाट्याने सहन करणार नाही..' राहुल गांधींनी रामलीला मैदानातील रॅलीचा हुंकार भरला, पण भाजपचे मनःपूर्वक आभार का मानले?
Embed widget