एक्स्प्लोर

शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्याला फाशी द्या : अजित पवार

“शेतकरी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी,” अशी मागणी करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात शेतकरी प्रश्नावरुन सरकारवर हल्ला चढवला.

  नागपूर : “शेतकरी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी,” अशी मागणी करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात शेतकरी प्रश्नावरुन सरकारवर हल्ला चढवला. ‘शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेत मिळायला हवं. बँकेचा सचिव शेतकरी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत आहे. हे महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं. त्याच्या घरी आयाबहिणी नाहीत काय ? सरकार  अशांवर कारवाई का करत नाही?’ असा सवाल करत अजित पवारांनी सरकारला धारेवर धरलं. कर्जमाफीची घोषणा फसवी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुनही अधिवेशनात अजित पवार आक्रमक झालेले पहायला मिळाले. ‘मागील वर्षी जून महिन्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. त्यावेळी मोठा गाजावाजा करण्यात आला. आतापर्यंत किती शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा झाला, याचे आत्मचिंतन सत्ताधाऱ्यांनी करणं गरजेचं आहे,’ असं ते म्हणाले. ‘सरकारने कर्जमाफीचा अर्ज घेण्यासाठी काढलेली ऑनलाइन यंत्रणा नीट नव्हती. बँका आणि सरकारच्या कारभारात ताळमेळ नव्हता. एकाही शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळालेला नाही. सरकारने दीड लाखाची तरी कर्जमाफी केली पाहिजे,’ अशी मागणीही अजित पवारांनी केली. ...तर नावाचा अजित पवार नाही  ‘सत्ताधारी पक्षाकडे कोणी नव्हतं म्हणून इतर पक्षातून माणसं आणली. मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेसमधून भाजपने माणसं आयात केली आहेत. स्वतःचे लोक राहिले मागे, आमचीच लोक घेऊन सत्ताधाऱ्यांची पोटं मोठी झाली,’ असा टोला त्यांनी भाजपला लगावला. ‘जे सोडून गेले ते कुणाचे नाही. ते उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे लोक आहेत. उद्या सत्ता आली की ते परत आमच्याकडेच येतील, नाही आले तर नावाचा अजित पवार नाही,’ असं म्हणत त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या लोकांना फटकारलं आहे. हमीभावावरुन निशाणा ‘निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदींनी दीडपट हमीभावाचं आश्वासन दिलं होतं. म्हणून लोकांनी कमळाचे बटन दाबलं. पण हे सरकार जुमला दाखवण्यात माहीर आहे,’ अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी बाकावर असताना कापसाला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा अशी मागणी करत. आता तुमचे सरकार असताना कापसाला ७ हजार हमीभाव का देत नाही’, असा सवाल अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Embed widget