एक्स्प्लोर

बरेच लोक म्हणाले MIDC आणणार पण आली का? अजित पवारांचा रोहित पवारांना टोला, म्हणाले, मी त्याला किती निधी दिला याची माहिती घ्या

रोहित (Rohit Pawar) माझ्यासोबत असताना मी किती कोटींचा निधी दिला याची माहिती घ्या असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं

Ajit Pawar on Rohit Pawar : रोहित (Rohit Pawar) माझ्यासोबत असताना मी किती कोटींचा निधी दिला याची माहिती घ्या असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. बऱ्याच लोकांनी म्हटलं की MIDC आणणार पण आली का MIDC? असा सवाल करत अजित पवार यांनी आमदार रोहित पवारांना टोला लगावला. आता MIDC आणण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित अहिल्यानगर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांचा राष्ट्रवादी (AP) पक्षात प्रवेश झाला. यावेळी अजित पवार बोलत होते. अण्णासाहेब शेलार यांनी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  उमेदवारी दिली होती. अण्णासाहेब शेलार यांच्या रुपाने राष्ट्रवादी AP ला श्रीगोंद्यात बळ मिळणार आहे. 

अहिल्यानगरच्या कारखान्यांची काय अवस्था आहे? 

अहिल्यानगरच्या कारखान्यांची काय अवस्था आहे? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. मी कारखान्यांची नावं घेणार नाही. नाहीतर काही लोक फोन करुन म्हणतील जामखेडच्या भाषणात आमच्या कारखान्याचं कशाला काढलं? पण जनतेने कारखाना, जिल्हा बँक, सोसायट्यांकडे लक्ष ठेवले पाहिजे. अनेक संस्थांची वाईट परिस्थिती झाली आहे. बारामतीचा विकास काही उगीच झालेला नाही. कामं करावी लागतात असे अजित पवार म्हणाले. जामखेडमधील रखडलेल्या रस्त्यासाठी मी वेळप्रसंगी नितीन गडकरी साहेबांशी बोलेल असे अजित पवार म्हणाले. मी रस्त्यांची कामं करण्यासाठी वेळप्रसंगी लोकांशी वाईटपणा घेतला. काही जणांची घर काढावी  लागल्याचे अजित पवार म्हणाले. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला शोभेल असे स्मारक उभारणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला शोभेल असे स्मारक अहिल्यानगर जिल्ह्यात उभारणार असल्याचे अजित पवार म्हणाले. अर्थ खातं आपल्याकडे असल्यानं या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही असे अजित पवार म्हणाले. आपल्याला काम अत्यंत चोख केलेलं लागत असेही ते म्हणाले. 

 जो माणूस योग्य दिशेने कामं करतो त्याच्या मागे उभं राहा

वाद घालून कुणाचं भल झालेलं नाही. जो माणूस योग्य दिशेने कामं करतो त्याच्या मागे उभं राहा असे अजित पवार म्हणाले. मी कधीही कुणावर टीका करत नाही. जनतेने त्यांचं काम केलं आहे, लाडक्या बहिणीने आमचं काम केलं आहे असे अजित पवार म्हणाले. त्यामुळं वाद करत बसू नका, असे अजित पवार म्हणाले. आमच्या मतदारसंघातील कामाकडे माझे बारीक लक्ष असते. बारामतीतील इमारती कशा आहेत? ते उगीच नाही. जनतेला माझी विनंती आहे की जात धर्म प्रांत यावरून समाजात तेढ निर्माण होऊ देऊ नका असे अजित पवार म्हणाले. आपल्या घरात आलेल्या लेकी बाळीना सांगा एक किंवा दोन आपत्यवर थांबा. नाहीतर ब्रम्हदेव आला तरी भविष्यात पाणी पुरणार नाही असे अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Hingoli FDA Action: हिंगोलीत प्रसिद्ध खिचडी-भजीच्या चवीवर अस्वच्छतेचा डाग; खिचडीत चक्क आळ्या, अन्न विभागाची धडक कारवाई, महाराजा हॉटेलचा परवाना रद्द!
हिंगोलीत प्रसिद्ध खिचडी-भजीच्या चवीवर अस्वच्छतेचा डाग; खिचडीत चक्क आळ्या, अन्न विभागाची धडक कारवाई, महाराजा हॉटेलचा परवाना रद्द!
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Embed widget