एक्स्प्लोर

Maharashtra Politics: अजित पवारांनी ट्विटरचं प्रोफाईल बदललं; आता 'उपमुख्यमंत्री' असा उल्लेख

Ajit Pawar : राज्याच्या राजकरणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असून अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या इतर 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Maharashtra Political Crisis: अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला आहे. अजित पवार (Ajit Pawar)  यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा दिला. अजित पवारांनी चार वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या ट्विटर हँडलचं प्रोफाईल बदललं आहे. त्यांनी आपल्या प्रोफाईलमध्ये 'उपमुख्यमंत्री' (Deputy Chief Minister) पदाचा उल्लेख केला आहे.

अजित पवारांच्या ट्विटर प्रोफाईलवर राष्ट्रवादीचा झेंडा होता. आता अजित पवारांनी स्वत:चा फोटो आणि त्याखाली बायोमध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा उल्लेख केला आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे शरद पवारांना (Sharad Pawar) चांगलाच धक्का बसला आहे. राष्ट्रवादी पक्षात आता फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार आपल्यासोबत असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आणि त्यामुळे राष्ट्रवादी पक्षावर देखील अजित पवारांनी दावा केला आहे.

राष्ट्रवादीचे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे फक्त आमदारच नव्हे, तर 2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले आहेत. खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare)  आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे दोन्ही खासदार देखील अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

पहाटेच्या शपथविधीनंतर आता दुपारच्या शपथविधीच्या चर्चा होत आहे. पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्योराप झाले आणि पहाटेच्या शपथविधीनंतर 72 तासांत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार पडलं होतं. मात्र, आता दुपारी अजित पवार यांनी शपथविधी घेतली आहे, त्यामुळे दुपारचा शपथविधी पहाटेच्या शपथविधीवरचा डाग मिटवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोणी शपथ घेतली?

अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

याआधी 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पहाटेच्या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. 

हेही वाचा:

Maharashtra News: पहाटेचा शपथविधी अखेर साक्षात उतरला! महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Baburao Chandere Vastav 124 : बाबूराव चांदेरेंनी बिल्डरला का मारलं? पुणे कशामुळे बकाल होतंय ?Beed Sudarshan Ghule : सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा फॉरेन्सिक विभागाकडून रिकव्हरSanajy Raut On BMC Elections : मविआ विधानसभेसाठीच निर्माण झाली, इंडिया आघाडी लोकभेसाठी झाली होतीपर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ| Akshay Kothari, Isha Kesakar

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल 
माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
Embed widget