एक्स्प्लोर

राज्यात 15,511 रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मंजुरी; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

MPSC : गट अ वर्गातील 4417, गट ब वर्गातील 8031 आणि गट क वर्गातील 3063 पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

मुंबई : राज्यातील विविध विभागातील 15,511 रिक्त पदांची एमपीएससीकडून भरती करण्यात येणार आहे. या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. 

ज्या ज्या विभागानी रिक्त पदे भरण्याचे प्रस्ताव दिले त्याला वित्त विभागाने मंजुरी दिली असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. त्यानुसार 2018 पासून  विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत भरण्यात येणार आहेत. 

गट अ- 4417
गट ब- 8031
गट क- 3063

अशी एकूण 15,511 इतकी पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली. 

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 31 जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली होती. राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. त्याचा फटका सर्वांनाच बसला. स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. लोणकर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राज्यात यापुढे अशी घटना घडणार नाही या संदर्भात आम्ही काळजी घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

एमपीएससी हे मायाजाल आहे असं म्हणत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या स्वप्नील लोणकर या तरुणानं पुण्यात आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने लिहिलेल्या सुसाईड नोटमधे आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखडल्याने आत्महत्या करत असल्याच म्हटलं आहे. स्वप्नीलने 2019 आणि 2020 मधे झालेली एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होत यश मिळवलं होतं. पण पुढे या परीक्षांचाच भाग असलेली तोंडी परीक्षा दीड वर्ष झालीच नाही. 

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येवरुन विरोधकांनी अधिवेशनात राज्य सरकारवर टीका केली. त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी ही घोषणा केली

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Lanke : औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारचा वेळकाढूपणा, निलेश लंकेंनी डागली तोफ; म्हणाले, फडणवीसांनी ठरवलं तर...
औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारचा वेळकाढूपणा, निलेश लंकेंनी डागली तोफ; म्हणाले, फडणवीसांनी ठरवलं तर...
Suresh Dhas : ...तर धनंजय मुंडे आकाच्या शेजारी जाणार; सुरेश धसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मला त्यांची कीव येते!
...तर धनंजय मुंडे आकाच्या शेजारी जाणार; सुरेश धसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मला त्यांची कीव येते!
Beed Crime  : बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक! महिलादिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं अन्...; परिसरात खळबळ
बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक! महिलादिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं अन्...; परिसरात खळबळ
जगात कोणत्या देशाचे चलन सर्वात महाग आहे?
जगात कोणत्या देशाचे चलन सर्वात महाग आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh:Krushna Andhale ला पोलिसांकडूनच अभय मिळत होतं,पोसणाऱ्यांनीच त्याला शिक्षा द्यावीMNS Vardhapan Din Special Report : राज ठाकरेंचा मनसैनिकांना कोणता कानमंत्र?Baramati Aakrosh Morchaदेशमुख हत्या प्रकरणी बारामतीत आक्रोश मोर्चा,3 महिन्यानंतरही कृष्णा आंधळे फरारSpecial Report Marathi :हॉटेलात मेन्यू कार्ड मराठी करा,ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह, मुंबईकर म्हणतात..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Lanke : औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारचा वेळकाढूपणा, निलेश लंकेंनी डागली तोफ; म्हणाले, फडणवीसांनी ठरवलं तर...
औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारचा वेळकाढूपणा, निलेश लंकेंनी डागली तोफ; म्हणाले, फडणवीसांनी ठरवलं तर...
Suresh Dhas : ...तर धनंजय मुंडे आकाच्या शेजारी जाणार; सुरेश धसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मला त्यांची कीव येते!
...तर धनंजय मुंडे आकाच्या शेजारी जाणार; सुरेश धसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मला त्यांची कीव येते!
Beed Crime  : बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक! महिलादिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं अन्...; परिसरात खळबळ
बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक! महिलादिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं अन्...; परिसरात खळबळ
जगात कोणत्या देशाचे चलन सर्वात महाग आहे?
जगात कोणत्या देशाचे चलन सर्वात महाग आहे?
Virat Kohli Profile : क्रिकेटचा 'किंग', क्रीजवर टिकला की विरोधी संघाला सळो की पळो करून सोडणारा लढवय्या 'विराट'
क्रिकेटचा 'किंग', क्रीजवर टिकला की विरोधी संघाला सळो की पळो करून सोडणारा लढवय्या 'विराट'
IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमला जॅकपॉट लागणार, जो जिंकेल त्याच्यावर पैशांचा पाऊस; जाणून घ्या नेमकं काय-काय मिळणार?
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमला जॅकपॉट लागणार, जो जिंकेल त्याच्यावर पैशांचा पाऊस; जाणून घ्या नेमकं काय-काय मिळणार?
ST Bus : एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
VIDEO: एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, तर दुसरीकडे गोविंदावर कोसळला दुःखाचा डोंगर; ढसाढसा रडला अभिनेता
एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, तर दुसरीकडे गोविंदावर कोसळला दुःखाचा डोंगर; ढसाढसा रडला अभिनेता
Embed widget