एक्स्प्लोर

नगरसेवकाला मारहाणीनंतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा राडा

विरोध करणाऱ्या या एमआयएमच्या नगरसेवकाला भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी बेदम चोप दिला. मात्र त्यानंतर या नगरसेवकाच्या समर्थकांनी भाजप नेत्यांच्या गाड्यांची तोडफोड केली.

औरंगाबाद : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींच्या शोकप्रस्तावास विरोध केल्याचा संतापजनक प्रकार औरंगाबाद महापालिकेत घडला. विरोध करणाऱ्या या एमआयएमच्या नगरसेवकाला भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी बेदम चोप दिला. मात्र त्यानंतर या नगरसेवकाच्या समर्थकांनी भाजप नेत्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव महापौरांनी मांडला. मात्र या प्रस्तावास एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन याने विरोध दर्शवला. त्यावरून शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी सय्यद मतीनला चपलेने तसंच लाथा-बुक्क्यांनी बेदम मारलं. या मारहाणीनंतर सय्यद मतीन याचं नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी इतर नगरसेवकांनी केली. यानंतर संतप्त झालेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोरील भाजप संघटना मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड केली. तोडफोड केल्याप्रकरणी नगरसेवकासह एमआयएमच्या 100 कार्यकर्त्यांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही पक्षाची भूमिका नाही : इम्तियाज जलील श्रद्धांजली वाहण्याच्या प्रस्तावाला विरोध करणं ही एमआयएमची भूमिका नाही, ते सय्यद मतीन यांचं वैयक्तिक मत होतं, असं स्पष्टीकरण एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी दिलं. एमआयएम या नगरसेवकाच्या पाठीमागे उभं राहणार नसून याला समर्थन देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. वंदे मातरमलाही विरोध दरम्यान, सय्यद मतीन याच नगरसेवकाने वंदे मातरम म्हणण्यावरुनही महापालिकेच्या सभागृहात राडा घातला होता, असं भाजपच्या नगरसेवकांनी सांगितलं. याअगोदर दोन ते चार वेळा सय्यद मतीनने काही ना काही कारण काढून गोंधळ घातल्याचं नगरसेवकांचं म्हणणं आहे. पाण्याच्या प्रश्नावरुनही सय्यद मतीनने महापौरांना खुर्ची फेकून मारली होती. त्यामुळे त्याचं नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे, अशी माहिती नगरसेवकांनी दिली. व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
Uddhav Thackeray: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
Sharad Pawar on Dharmendra Pradhan Resignation: 'माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोदींसोबतच्या 'त्या' भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली
'माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोदींसोबतच्या 'त्या' भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Embed widget