एक्स्प्लोर

अहमदनगर हत्याकांड : 600 शिवसैनिकांवर गुन्हे

कोतवाली पोलिस ठाण्यात दोन दिवसांनी गुन्हा दाखल झाल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

अहमदनगर : शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर अहमदनगरमध्ये 600 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला आहे. हत्याकांडानंतर दगडफेक, रस्ता रोको, शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा, मृतदेहाची अवहेलना यासह अनेक गंभीर गुन्हे शिवसैनिकांवर दाखल केले आहेत. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह शहरप्रमुख, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह तब्बल 600 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात दोन दिवसांनी गुन्हा दाखल झाल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती. पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली होती. त्याचबरोबर मारेकऱ्यांच्या अटकेसाठी मृतदेह घटनास्थळीच ठेऊन रस्तारोको केला होता. रुग्णवाहिकाही थांबून ठेवल्याने तीन तासांपेक्षा जास्त वेळ मृतदेह घटनास्थळीच होते. पोलिसांना पंचनामाही करण्यास विरोध करण्यात आला होता. यामुळे परिसरात तणावाचं आणि भीतीचं वातावरण झालं होतं. मात्र गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी चर्चा केल्यावर पंचनामा करण्यात आला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आता शिवसैनिकांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. काय आहे प्रकरण? बिहारलाही लाजवेल असा प्रकार अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान घडला. राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे शनिवारी सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करुन गुप्तीनेही वार करण्यात आले. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी 7 एप्रिलला हे हत्याकांड झालं. रक्तरंजित पोटनिवडणूक अहमदनगरमधल्या केडगाव प्रभाग क्रमांक 32 मधल्या पोटनिवडणुकी दरम्यान हा रक्तरंजित प्रकार घडला. या पोटनिवडणुकीत माजी महापौर संदीप कोतकरचा चुलत भाऊ विशाल कोतकर हा कॉँग्रेसकडून विजयी झाला. त्यानं शिवसेनेच्या विजय पटारेचा पराभव केला. या निवडणुकीपूर्वीपासून शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये राजकीय वाद झाला होता. त्याचबरोबर शाब्दिक चकमकही उडाली होती. त्यामुळे याचंच पर्यवसान हत्यांमध्ये झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. याप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांचे वडील आमदार अरुण जगताप आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर आणि त्यांचा मुलगा- माजी महापौर संदीप कोतकर यांच्यासह 50 जणांवर कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्राम जगतापांसह विजयी उमेदवार असलेल्या विशाल कोतकरचे वडील बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळ आणि भानुदास कोतकर यांना अटक करण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप यांना शनिवारी रात्रीच ताब्यात घेण्यात आलं होतं, त्यानंतर रविवारी पहाटे त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबरच त्यांचे वडील आमदार अरुण जगताप  यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेनं रविवारी अहमदनगर बंदची हाक दिल्यानंतर रस्त्यांवर कडकडीत बंद पाळल्याचं चित्र पाहायला मिळालं. अहमदनगर शहरात शिवसेनेने निषेध मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. सर्व आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत दोन्ही शिवसैनिकांच्या पार्थिवाचे अंत्यविधी करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचं शहराध्यक्ष दिलीप सातपुते यांनी सांगितलं. कोणत्या पक्षाचा कोण आमदार, कोण कोणाचा नातेवाईक? संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तर त्यांचे वडील अरुण जगताप राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर आमदार आहेत. संग्राम यांचे सासरे शिवाजी कर्डिले भाजपचे आमदार आहेत. कर्डिले यांची कन्या आमदार संग्राम यांची पत्नी आहे, तर कर्डिलेंची दुसरी कन्या सुवर्णा या माजी उपमहापौर असून माजी महापौर संदीप कोतकर यांची पत्नी आहेत. कोतकर यांची कन्या आमदार अरुण जगताप यांची सून आहे. राजकारण अबाधित ठेवण्यासाठी हाडवैर असलेल्या तिघांनी सोयरीक केली, मात्र राजकारणमुळे अशोक लांडे हत्येनंतर पुन्हा हे संकटात सापडले आहेत. लांडे हत्या प्रकरणी कर्डिले यांनीही तुरुंगवास भोगला आहे. एसपी कार्यालयातील तोडफोड प्रकरणी गुन्हे भाजप आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिजीत कळमकर, आमदार संग्राम जगताप यांचे भाऊ, झेडपी सदस्य सचिन जगताप, नगरसेवक कैलास गिरवले यांच्यासह चार नगरसेवक आणि अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर एसपी कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित बातम्या इतर पक्षातील आयात नेत्यांमुळे भाजपच्या अडचणीत वाढ शिवसैनिकांची हत्या: भाजप आमदार शिवाजी कर्डिले अटकेत नगरमध्ये निवडणुकीच्या वादातून दोन शिवसैनिकांची हत्या शिवसैनिकांची दुहेरी हत्या, आमदार संग्राम जगतापांना पोलिस कोठडी नगरमध्ये तणाव, पालकमंत्री राम शिंदे थीम पार्कच्या उद्घाटनाला भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून संगनमताने हत्या : रामदास कदम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget