एक्स्प्लोर

Ahmednagar: आधुनिक सावित्री! बिबट्याच्या जबड्यात पतीचं डोकं, ठोसे लगावून पत्नीने पतीचा जीव वाचवला

बिबट्याच्या जबड्यात पतीचं डोकं होतं. पती मृत्यूचा दाढेत असतानाही पत्नीने हिंमत न हरता त्याशी झुंज दिली. तिच्या धाडसामुळे पतीचा जीव वाचला आहे. अहमदनगरमध्ये ही घटना घडली.

अहमदनगर : पौराणातील कथेनुसार सावित्रीने यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. अहमदनगर जिल्ह्यात अशीच आधुनिक सावित्री पाहायला मिळाली. बिबट्याच्या जबड्यात पतीचं डोकं अडकलेलं असतानाही त्याच्याशी झुंज देत पत्नीने त्याला पिटाळून लावलं आणि पतीचे प्राण वाचवले. पारनेर तालुक्यातील दरोडी चापळदरा इथे काल (28 मार्च) ही घटना घडली.

बिबट्याच्या जबड्यात पतीचं डोकं पकडलं होतं. पती मृत्यूचा दाढेत असतानाही पत्नीने हिंमत न हरता त्याशी झुंज दिली. तिच्या धाडसामुळे, प्रसंगावधनाने पतीचा जीव थोडक्यात वाचला आहे. गोरख पावडे असं बिबट्याने हल्ला केलेल्या पतीचं नाव असून संजना पावडे असं या धाडसी पत्नीचे नाव आहे. सोमवारी (28 मार्च) मध्यरात्री ही घटना घडली.

रात्रीच्या वेळी जनावरांच्या गोठ्यातून आवाज येत असल्याने गोरख पावडे हे गोठ्याकडे गेले. बिबट्या गोठ्यात आला होता. गोरख पावडे तिथे पोहोचताच बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत अक्षरशः त्यांचे डोके जबड्यात घेतलं. गोरख यांनी आरडाओरड केल्याने पत्नीने तिकडे धाव घेतली. संजना यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता थेट बिबट्याचे पाय आणि शेपटी जोरात ओढली आणि बिबट्याच्या पोटात बुक्क्यांचा मारा केला. तर त्यांच्या पाळीव कुत्र्याने मालकाला वाचवण्यासाठी बिबट्याच्या गळ्याचा चावा घेतला. गोरख पावडे यांचे वडील दशरथ यांनी दगडाने बिबट्याचा प्रतिकार केला. त्यामुळे बिबट्याने तिथून धूम ठोकली. 

पावडे कुटुंबियांनी दाखवलेल्या एकजुटीने गोरख पावडे यांचे प्राण वाचले. बिबट्याने जबड्यात डोकं पकडल्यामुळे गोरख पावडे यांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान त्यांची पत्नी संजना पावडे यांनी दाखवलेल्या धाडसाचे आता परिसरात कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या

याला म्हणतात प्रेम! बिबट्याचा वृद्ध महिलेवर हल्ला; जीवाची बाजी लावून 72 वर्षीय पतीने वाचवला पत्नीचा जीव

लुटमार करू पाहणाऱ्या दरोडेखोरांची पिस्तूल हिसकावत तिनं त्यांच्यावरच रोखली; अन्...

 

 

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Amit Thackeray Speech: अमित ठाकरे मनसेच्या कार्यक्रमात स्टेजवर भाषण करता करता अचानक थांबले, ब्लँक झाले, बोलायचं सुचेना... नेमकं काय घडलं?
अमित ठाकरे मनसेच्या कार्यक्रमात स्टेजवर भाषण करता करता अचानक थांबले, ब्लँक झाले, बोलायचं सुचेना... नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog updates: अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई; पुण्याचं राजकारण तापलं
Maharashtra Live blog updates: अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई; पुण्याचं राजकारण तापलं
Sanjay Raut on PM Narendra Modi: पीएम मोदी म्हणाले, मला मुलांना माफ करायचंय, संजय राऊतांची पंतप्रधानांवर बोचरी टीका; म्हणाले, ही अवदसा तुम्हाला आठवते तरी कशी?
पीएम मोदी म्हणाले, मला मुलांना माफ करायचंय, संजय राऊतांची पंतप्रधानांवर बोचरी टीका; म्हणाले, ही अवदसा तुम्हाला आठवते तरी कशी?

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Embed widget