एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
छिंदमची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर अहमदनगर भाजपमध्ये उभी फूट पडली.
अहमदनगर : शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा अहमदनगरमधील निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमला नागरिकांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात दिलं. शनिवारी कोर्टात हजर केल्यानंतर छिंदमला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
छिंदमची रवानगी एक मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. छिंदमची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर अहमदनगर भाजपमध्ये उभी फूट पडली.
शहर जिल्हाध्यक्ष आणि खासदार दिलीप गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा किंवा पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करावी अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अभय आगरकर यांनी केली आहे.
नगरच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
दिलीप गांधींनी आत्मपरीक्षण करावं असा सल्लाही देण्यात येत आहे. सर्वांचा विरोध असतानाही मनमानी करत खासदार गांधींनी छिंदमला उपमहापौर केल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याचबरोबर छिंदम हा काँग्रेस-राष्ट्रवादी विचाराचा कार्यकर्ता असल्याचंही आगरकरांनी म्हटलं आहे. त्यामुळे नगर भाजपली गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. काय आहे प्रकरण? अहमदनगरचे निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमची कथित क्लिप समोर आली आहे. एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना छिंदमने फोन केला, यावेळी बोलताना उपमहापौरांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप अशोक बिडवे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी कामगार युनियनकडे तक्रारही दाखल केली. छिंदमवर भाजपची कारवाई “शिवजयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करतो. छिंदम यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. छिंदम यांची उपमहापौर पदावरुनही हकालपट्टी करण्यात आली आहे.” अशी माहिती भाजपचे नेते आणि अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांनी दिली. या क्लिपनंतर शहरात तणाव निर्माण झाला. श्रीकांत छिंदमविरोधात राष्ट्रावादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला, तर शिवसेनेनंही छिंदम यांचा पुतळा जाळून निषेध केला आहे. या क्लिपमुळे शिवसेना आणि भाजपमधला अंतर्गत तणाव पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. श्रीपाद छिंदम काय म्हणाला? अशोक बिडवे – हॅलो साहेब... श्रीपाद छिंदम – बिडवे, काल माणसं आले नाही बरं का... अशोक बिडवे – काल किन्नर साहेब बोलले ना तुम्हाला, मी पण त्यांना बोललो होतो. श्रीपाद छिंदम – पाठवणार आहे, का नाही तेवढं सांग फक्त. बाकी कोणाचं नाव नको सांगू. अशोक बिडवे – बरं.. बरं.. पाठवतो. हे शिवजयंती होऊ द्या ना साहेब... श्रीपाद छिंदम – ते गेलं ##$%@##... तू काय शिवाजीच्या ##$%@##? अशोक बिडवे – अहो साहेब... सकाळी सकाळी चांगलं बोला... श्रीपाद छिंदम – मग... अशोक बिडवे – असं बोलतात काय सर.. तुम्हाला बोलतोय ना की माणसं नाहीयेत, शिवजयंती होऊ द्या... श्रीपाद छिंदम – माझं घरचं काम आहे ते... अशोक बिडवे – मग तुम्ही नीट बोला ना राव... श्रीपाद छिंदम – मग एक काम कर ना... शिवजयंतीचा इतका पुळका आहे, तर एक-दोन माणसं वाढून घे ना पालिकेतून... अशोक बिडवे – माणसं नाहीत म्हणून... पण तुमचं काम केलं नाही का कधी? श्रीपाद छिंदम – माणसं पाठव, बाकीचं नको सांगू तू.... बातमीचा व्हिडीओ :अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement