एक्स्प्लोर

Abdul Sattar : कृषीमंत्र्यांचा शेतकऱ्याच्या घरी मुक्काम, 'एक दिवस बळीराजासाठी..'

Abdul Sattar : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या  'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' (Majha Ek Divas Majhya Balirajasathi) या उपक्रमाला आजपासून सुरूवात झाली.

Abdul Sattar : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या  'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' (Majha Ek Divas Majhya Balirajasathi) या उपक्रमाला आजपासून सुरूवात झाली. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी संपूर्ण दिवस शेकऱ्यांसाठी दिला. त्यांच्यासोबत काम पाहिलं, अडचणी समजून घेतल्या. शेतकऱ्यांना शेती करताना काय अडचणी येतात? शेतकरी आत्महत्या करण्याच्या मार्ग का निवडतो? या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात अब्दुल सत्तार यांनी केली. विदर्भातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या मेळघाटातून अब्दुल सत्तार यांनी 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' या उपक्रमाची सुरुवात केली. अमरावती जिल्ह्यातील साद्राबाडी या गावात शैलेंद्र सालकर यांच्याकडे ते मुक्कामी  राहिले. कसा होता त्यांचा शेतकऱ्या सोबतचा एक दिवस पाहुयातयय

कृषीमंत्री अमरावतीच्या धारणी तालुक्यातील अडीच हजार लोकवस्ती असलेल्या साद्राबाडी गावात रात्री 9 च्या दरम्यान पोहचले. गावकऱ्यांनी त्यांचं औक्षण करून स्वागत केले. त्यांनी संजय धांडे यांच्या छप्पराच्या घरात जेवण आणि मुक्काम केला. त्याचवेळी गावकऱ्यांनी कृषिमंत्री समस्यांचा भडिमार केला. वेळ सकाळी 7 वाजता कृषीमंत्री बाजेवर बसून चहा पीत होते. त्यानंतर त्यांनी गावात फेरफटका मारला. कृषीमंत्री अब्दुल सत्तार ज्या घरात राहिले त्यांना ते स्वखर्चाने घर बनून देणार आहेत. 
 
कोणत्या त्रासाने शेतकरी त्रस्त आहेत ?
प्रश्न रानडुक्कराचा त्रास  आहे. शेतकरी कष्ट करतो, मेहनत करतो. पण रान डुक्कर पीक उडवस्त करतो. गावात तरुणांच्या हातात काम नाही, त्यामुळे लोक दिवाळी झाली की काम शोधण्यासाठी मुबई पुणे गाठतात. लवकर माल खरेदी करत नाही, त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांना माल विकतो. व्यापारी तोच माल नाफेडला चढ्या भावाने विकतो.

सकाळी 11 च्या दरम्यान अब्दुल सत्तार यांनी काही शेतीला भेटी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या.  त्यानंतर वनभोजन केले. कृषीमंत्री ज्या भागात शेतकऱ्यांसोबत एक दिवस थांबले होते. त्याच दिवशी साद्राबाडी गावापासून 15 किमी अंतरावर असलेल्या लकटू गावातील  अनिल ठाकरे  26 वर्षीय शेतकऱ्याने सव्वा लाखाच्या कर्जापोटी आत्महत्या केली. त्या कुटुंबाची त्यांनी भेट घेतली.

शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार

सुलभ आणि प्रभावी कृषी विषयक धोरण तयार करण्यासाठी  शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी  आणि प्रश्न प्रशासनाने समजून घेणे, त्यावर कोणत्या उपाययोजना करून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करुन शेतकरी समस्यांचे मुळापर्यंत जाणार आहेत. त्यासाठीच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी'  हा उपक्रम राज्यभर राबवण्याची संकल्पना मांडली आहे. या उपक्रमांतर्गत प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष शेतावर आणि ग्रामीण भागात राहणार आहेत. त्यांच्या दैनंदिन शेतीच्या कामकाजात येणाऱ्या अडचणींवर चर्चा करणार आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
Embed widget