एक्स्प्लोर

लसीकरणानंतर नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, चौकशी करण्याची वडिलांची मागणी

शुक्रवारी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना 'हिपॅटायटीस बी' ही लस देण्यात आली होती. त्यामध्ये जवळपास दहा विद्यार्थिनींना रिअॅक्शन झाली. इतर विद्यार्थिनींच्या प्रकृती सुधारणा होऊन त्यांना सुट्टी देण्यात आली, मात्र हिमानी मलोंडेची प्रकृती गंभीर झाल्यानं आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान आज पहाटे तिचा मृत्यू झाला.

वर्धा: वर्ध्यातील सावंगी (मेघे) इथल्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीचा 'हिपॅटायटीस बी'च्या लसीकरणानंतर रिअॅक्शन झाल्याने मृत्यू झाला. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.  हिमानी रवींद्र मलोंडे, असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. हिमानी ही सावंगी येथील राधिकाबाई मेघे मेमोरियल कॉलेज ऑफ नर्सिंगची बी एससी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. शुक्रवारी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना 'हिपॅटायटीस बी' ही लस देण्यात आली होती. त्यामध्ये जवळपास दहा विद्यार्थिनींना रिअॅक्शन झाली. इतर विद्यार्थिनींच्या प्रकृती सुधारणा होऊन त्यांना सुट्टी देण्यात आली, मात्र हिमानी मलोंडेची प्रकृती गंभीर झाल्यानं आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान आज पहाटे तिचा मृत्यू झाला. हिमानीच्या मैत्रीणीनं लसीकरणानंतर तिची प्रकृती बिघडल्याची माहिती दिल्याचं वडिलांनी सांगितलं. तांत्रिक बाबी माहिती नसून औषधीत दोष असू शकतो, असा अंदाज हिमानीच्या वडिलांनी वर्तवला आहे. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी हिमानीच्या वडिलांनी केली आहे. रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेसना संक्रमण होऊ नये म्हणून 'हिपॅटायटीस बी'च लसीकरण केलं जातं. शासनाच्या वतीनं याचा पुरवठा करण्यात आला होता. लाखात एखाद्या व्यक्तीबाबत अशी घटना घडते. आमच्या विद्यार्थिनीसोबत घडली, हे अत्यंत दुर्दैवी आहे. केंद्रीय अॅडवर्स ड्रग रिअॅक्शन बोर्ड दिल्ली तसेच शासन स्तरावर जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली असून रुग्णालयाची प्रशासकीय समिती चौकशी करत आहे. शासन स्तरावर चौकशीचे आदेश दिले असून पोलिसांचीही चौकशी सुरू आहे. सर्व चौकशीला सहकार्य करू, असं रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
आषाढी एकादशीपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार, द्वादशीपासून उघडीप, राज्यात नेमकं कसं असणार हवामान?
आषाढी एकादशीपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार, द्वादशीपासून उघडीप, राज्यात नेमकं कसं असणार हवामान?
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget