एक्स्प्लोर
टोमॅटो फेकल्याने सदाभाऊ चिडले, म्हणाले चिलटासारखं आंदोलन करु नका
सतत होणाऱ्या या विरोधामुळे सदाभाऊ खोत चांगलेच संतापले आहेत. त्यांनी थेट राजू शेट्टी यांना आव्हान देत चिलटासारखे आंदोलन करू नका असे म्हणत मैदानात येण्याचे आव्हान दिले.
परभणी : टोमॅटोला भाव मिळत नसल्याने आणि शासनाच्या उपाययोजना ठप्प असल्याने बुधवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. परभणी शहरातील बसस्थानकाजवळील उड्डाणपूल भागात दुपारी ही घटना घडली.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी खोत बुधवारी परभणी येथे आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.
या बैठकीनंतर खोत यांच्या वाहनांचा ताफा स्टेशन रोड, बसस्थानक मार्गाने पाथरीकडे निघाला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगंबर पवार, केशव आरमळ आदींसह इतर कार्यकर्ते उड्डाणपुलाजवळ सुरुवातीपासूनच थांबले होते. यावेळी पोलीस बंदोबस्तही होता. याच परिस्थितीत खोत यांच्या वाहनांचा ताफा पुढे निघून गेला.
सदाभाऊंचे राजू शेट्टींना खुले आव्हान
सतत होणाऱ्या या विरोधामुळे सदाभाऊ खोत चांगलेच संतापले आहेत. त्यांनी थेट राजू शेट्टी यांना आव्हान देत चिलटासारखे आंदोलन करू नका असे म्हणत मैदानात येण्याचे आव्हान दिले. सदाभाऊ पाथरीत पीक कर्जाच्या आंदोलनात मृत्यू पावलेल्या तुकाराम काळे या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयाना भेट देणार होते. परंतु यालाही स्वाभिमानी आणि भाकपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे सदाभाऊंना ती भेटही रद्द करावी. यामुळे सदाभाऊ खोत चांगलेच संतापले आणि त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टी यांच्यावर कडाडून टीका केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement