एक्स्प्लोर
आ. सुरेश लाड यांच्या कार्यकर्त्यांची इमॅजिकाच्या मॅनेजरला बेदम मारहाण
रायगड : आमदार सुरेश लाड यांच्या कार्यकर्त्यांनी खोपोलीतील अॅडलॅब्ज इमॅजिकाच्या व्यवस्थापकाला बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे मारहाण होत असताना सुरेश लाड तिथेच उपस्थित होते. बुधवारी हा प्रकार घडला.
आमदार लाड यांच्या 10 ते 12 समर्थकांनी अॅडलॅब्ज इमॅजिकाचे व्यवस्थापक ईवान यांना मारहाण केली. ही मारहाण कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसात अद्याप तक्रार दाखल झालेली नाही.
मारहाणीचं कारण काय?
अॅडलॅब्ज कंपनीने तैयब खान नावाच्या कर्मचाऱ्याला कामावरुन काढलं होतं. त्याविरोधात त्याचं उपोषण सुरु होतं. आमदार सुरेश लाड कार्यकर्त्यांसह या कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी गेले होते. पण यावेळी तिथे कंपनीची एचआर मॅनेजर ईवानही तिथे आले. ते तिथे सिगरेट ओढत होते. आमदार समोर असतानाही मॅनेजर सिगरेट ओढत असल्याचा राग कार्यकर्त्यांना आला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी सुरेश लाड यांच्यादेखत मॅनेजरला मारहाण केली.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement