एक्स्प्लोर

Aditi Tatkare on Ladaki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट, आदिती तटकरेंचे ऑनलाईन पोर्टलबाबत महत्त्वपूर्ण आवाहन

Aditi Tatkare on Ladaki Bahin Yojana : महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारने पावसाळी अधिवेशनादरम्यान, महत्त्वपूर्ण योजना आणली आहे. अर्थसंकल्पात राज्य सरकारने महिलांसाठी 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना' या योजनेचे घोषणा केली.

Aditi Tatkare on Ladaki Bahin Yojana : महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारने पावसाळी अधिवेशनादरम्यान, महत्त्वपूर्ण योजना आणली आहे. अर्थसंकल्पात राज्य सरकारने महिलांसाठी 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना' या योजनेचे घोषणा केली. लाडकी बहिण योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. या वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार असल्याचे राज्य सरकारने घोषित केले आहे. या योजनेच्या घोषणेनंतर राज्यभरातील महिलांनी फॉर्म भरण्यासाठी गर्दी केली आहे. दरम्यान, मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. 

लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट, आदिती तटकरेंचे महत्वपूर्ण आवाहन 

लाडकी बहिण योजनेत आता अॅपसोबत ऑनलाईन पोर्टलवर फॉर्म भरता येणार आहे. याशिवाय ऑफलाईन सुविधाही सुरु आहे. इतर कुठल्याही योजनांवर नकारात्मक पडसाद या योजनेवर उमटणार नाहीत, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. “माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने घोषित केली आहे. काल त्यात काही बदल करण्यात आले आहेत. 21 वर्षांपासून 65 वर्षांपर्यंत ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे, त्यांना 1500 रुपये प्रतिमहिना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार 

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना 1 जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा, लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगटऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्याचा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

इतर महत्वाच्या बातम्या 

Sharad Pawar on Ajit Pawar : कुठल्या का होईना बहि‍णींना द्या, लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवारांचा अजितदादांना टोला

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSandeep Deshpande :  मनसेच्या कार्यक्रमाचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण, काका-पुतण्या एकत्र येणार?100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 19 Sept 2024Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 19 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
Embed widget