एक्स्प्लोर

राज्यात 'पिंक रिक्षा' योजना लवकरच, मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा

Aditi Sunil Tatkare News : महिलांना रोजगाराच्या (Jobs) संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकार नवी योजना आणणार आहे.

Aditi Sunil Tatkare News : महिलांना रोजगाराच्या (Women Empowerment) संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकार नवी योजना आणणार आहे. त्याअंतर्गत महत्त्वाच्या शहरांत 'पिंक रिक्षा' (Pink rickshaw) ही योजना लवकरच सुरू करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी जाहीर केले. आदिती तटकरे यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर याचं स्वागत करण्यात आलेय.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ही योजना सूरू करणार असून प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर व ठाणे या शहरांचा समावेश असू शकतो.

महिला व बालविकास विभागाच्या (Women and child development) योजनांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात आदिती तटकरे (Aditi Tatkare ) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलाविली होती. या बैठकीत त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या की, ही योजना परिपूर्ण करावी. यामध्ये लाभार्थी निवड, ई-रिक्षाला प्राधान्य देणे, बँका निवड तसेच प्रशिक्षण या सर्व बाबी तपासून घ्याव्यात. प्रायोगिक तत्त्वावर मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरठाणे या ठिकाणी ही योजना सुरू करण्याचा मानस आहे. महिलांना सॅनिटरी पॅड पुरविण्यासाठी गरजू लाभार्थी निवड-निकष तपासून ही योजनाही यशस्वीपणे राज्यात राबवावी, अशा सूचना आदिती तटकरे यांनी दिल्या. लैंगिक अत्याचार आणि बलात्कारांपासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने रांचीमध्ये पहिल्यांदा गुलाबी रिक्षा 2013 ला सुरू केली होती. कालांतराने त्या भारतातील इतर अनेक शहरांमध्ये सादर करण्यात आल्या. कायदेशीर पडताळणी आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर प्रशिक्षित व्यावसायिक, मुख्यत्वे महिला या ऑटो चालवतात.

बालधोरणांची माहिती संकेतस्थळावर

राज्यातील प्रत्येक बालकाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सर्वसमावेशक असे बालधोरण महिला व बालविकास विभाग तयार करत आहे. जनतेच्या हरकती आणि सूचना मागवण्यासाठी विभागाने बालधोरणाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशा सूचना मंत्री तटकरे यांनी यावेळी दिल्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
×
Embed widget