Kolhapur Crime : 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा डंपरने धडक दिल्याने मृत्यू; कोल्हापूर सांगली महामार्गावर घडली घटना
Kolhapur Crime : 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला.

Kolhapur Crime : 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला. कल्याणीने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेसह अनेक मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमठवला होता. कल्याणीने काही दिवसांपूर्वीच 'प्रेमाची भाकरी' नावाचे हाॅटेल सुरु केले होते. यावेळी हाॅटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला.
कोल्हापूर-सांगली महामार्ग मृत्यूचा सापळा
कोल्हापूर सांगली महामार्ग पूर्णत: खड्ड्यात गेल्याने मृत्यूचाच सापळा झाला आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांनी आतापर्यंत निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. अनेक ठिकाणी रस्ताच उखडल्याने पॅचवर्कची ठिगळं काय कामाची? अशी परिस्थिती आहे. विविध संघटनांकडूनही या रस्त्यासाठी आंदोलने करण्यात आली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
























