एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 3 जून 2019 | सोमवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 3 जून 2019 | सोमवार
- गोदावरी खोऱ्यात पाणी आणून संपूर्ण मराठवाडा दुष्काळमुक्त करु, गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन https://bit.ly/2JTjsOa तर जेजुरीच्या खंडेरायाला टँकरच्या पाण्याने अभिषेक घालण्याची वेळ https://bit.ly/2XpKrUW
- शिवसेना भाजपमध्ये पुन्हा ‘सामना’, जाहिरातबाजी न करता कृती करा, जीडीपी-बेरोजगारीवरुन शिवसेनेचा सामनातून खोचक सल्ला https://bit.ly/2Wcfhim
- नागपूर शासकीय रुग्णालयात डॉक्टर नसल्याने महिलेची स्वत:च्याच हाताने प्रसुती, रुग्णालयाच्या निष्काळजीपणाबद्दल उच्चस्तरीय समिती स्थापन, पालकमंत्र्यांचेही चौकशीचे आदेश https://bit.ly/2wyxMDh
- महात्मा गांधीजींविषयीचं उपरोधिक ट्वीट भोवलं, मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरींना कारणे दाखवा नोटीस, मंत्रालयात बदली https://bit.ly/2KlRSJ6
- शक्ती मिल बलात्कारप्रकरणी फाशीची शिक्षा न्यायसुसंगत, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा करण्याचा मार्ग मोकळा https://bit.ly/2ESslDQ
- मुलींच्या हातात एअर रायफल देत विहिंपची शोभायात्रा, पिंपरीतला धक्कादायक प्रकार, विनापरवाना शोभायात्रा काढल्याने गुन्हा दाखल https://bit.ly/2WhanWa
- बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेतील गुण कळणार, गुणपत्रिकेची झेरॉक्स उपलब्ध करुन देण्याचे बोर्डाचे कॉलेजांना आदेश https://bit.ly/2MAXNge
- आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून आशा सेविकांच्या मानधनात तिपटीहून जास्तीची वाढ, ज्येष्ठ नागरिकांनाही तीन हजाराच्या निवृत्तीवेतनाची घोषणा https://bit.ly/2IdShL0
- येत्या पाच दिवसात राज्यात उष्णतेची लाट, हवामान खात्याचा अंदाज, मान्सूनपूर्व पावसाचीही शक्यता, मुंबईसह पुण्यात ढगाळ वातावरण https://bit.ly/2XmHZ1f
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement