एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 डिसेंबर 2019 | बुधवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 डिसेंबर 2019 | बुधवार
1. केंद्राने जीएसटीतील महाराष्ट्राची 15 हजार 558 कोटींची थकबाकी द्यावी, रक्कम मिळाल्यास विकासकामांना वेग येईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र https://bit.ly/38u4R59
2. शिवसेनेसाठी भाजपची दारं खुली होती आणि राहतील, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, तर्क-वितर्कांना उधाण https://bit.ly/2sedkZs
3. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव, राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव, येत्या तीन वर्षांमध्ये प्रकल्प पूर्ण करणार, एकनाथ शिंदेंची माहिती https://bit.ly/2YCZc82
4. भाजपच्या कार्यकाळात गोपीनाथ मुंडेंचं स्मारक रखडलं, उद्धव ठाकरे ते पूर्ण करतील; भाजप नेते एकनाथ खडसेंना विश्वास https://bit.ly/2t7QmUk
5. गोपीनाथ गडावरील मेळाव्यासाठी पंकजा मुंडे परळीत, उद्या भूमिका स्पष्ट करणार, नवी संघटना काढणार असल्याची चर्चा https://bit.ly/2YIVgmn
6. देवेंद्र फडणवीसांनीच भाजपच्या बड्या नेत्यांना पराभूत केल्याचे चित्र सध्या तयार झालं आहे, एबीपी माझाच्या 'ऐसपैस गप्पा' या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य https://bit.ly/2E9fWdI
7. नागरिकत्व विधेयकाचा राज्यसभेतील मार्ग मोकळा; चार खासदारांना प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहण्याची अनुमती, बहुमताचा आकडा 119 वर https://bit.ly/2Pd7QHe
8. महापौरांच्या दालनात वास्तूशास्त्रानुसार बदल, खेळती हवा आणि प्रकाशासाठी दालनात बदल केल्याची महापौर किशोरी पेडणेकर यांची सारवासारव https://bit.ly/2E9Ma8W
9. मुंबईतल्या जलाशयांमध्ये आढळला महाकाय विषाणू, आयआयटी मुंबईच्या बायोसायन्स विभागातील शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांचं संशोधन https://bit.ly/2si7S7I
10. देशभर आज दत्त जयंतीचा उत्साह, नृसिंहवाडीसह शिर्डी शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी https://bit.ly/36q4Mxg
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement