एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 09 जानेवारी 2019 | बुधवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 09 जानेवारी 2019 | बुधवार*
- चौकीदार झोपत नाही, चोरांना पकडतो, आरोपांवरुन पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर पलटवार, सोलापुरात अनेक विकासकामांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन https://goo.gl/rFLtA6
- सोलापुरात एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण, मोदींना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केल्यानं चोप, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात https://goo.gl/NNvjgc
- पीकविम्यामध्ये राफेलपेक्षा मोठा घोटाळा असल्याचा उद्धव ठाकरेंचा बीडमध्ये आरोप, https://goo.gl/4FybMj युतीची चर्चा गेली खड्ड्यात, शेतकऱ्यांचं काय ते बोला, दुष्काळग्रस्तांना मदत देताना घणाघात https://goo.gl/u5yoe5
- मध्यरात्री मुख्यमंत्री फडणवीस यांचा गुप्त दिल्ली दौरा, पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष शाह यांच्याशी चर्चा, अचानक दौऱ्याने राजकीय वर्तुळात कुजबूज https://goo.gl/KcTuws
- बेस्ट संप चिघळला, कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटीसा, घर खाली करण्याच्या सूचना, आदेश देऊनही शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार संघटनांचे कर्मचारी कामावर नाही, उद्धव ठाकरे लक्ष घालणार https://goo.gl/s1DrDV
- आर्थिक आरक्षण कोर्टात टिकेल, पण मराठा आरक्षण टिकणं कठीण, माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं मत https://goo.gl/wuJdLD
- गरीबांच्या आरक्षण विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरूच, समाजवादी पक्षाकडून पाठिंबा जाहीर, 8 तास चर्चा चालण्याची शक्यता https://goo.gl/ixwfVC
- नागपुरातील किंग्ज वे रूग्णालयाच्या निर्माणाधीन इमारतीला भीषण आग, आगीवर नियंत्रण मात्र धुराचं साम्राज्य कायम, 8 कामगारांची सुखरुप सुटका https://goo.gl/P19tf6
- साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशींचा राजीनामा, उद्घाटनाच्या वादानंतर पाऊल, संमेलन संपेपर्यंत राजीनामा मंजूर होणार नसल्याची माहिती https://goo.gl/BDYuvN
- अयोध्या प्रकरणी गठित सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठात तीन मराठमोळे न्यायमूर्ती, सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी https://goo.gl/BDA3yf
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement