एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 01/04/2018
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 01/04/2018
- आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच पेट्रोल-डिझेलचे दर भडकले, मुंबईत पेट्रोलची ऐंशी तर राजधानीत सत्तर रुपयांच्या पार, सर्वसामान्य ग्राहकांना मनस्ताप https://goo.gl/WPPs3i
- आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात, सर्व बिलं महागणार https://goo.gl/4xVZky तर स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आजपासून तीन नवे नियम लागू https://goo.gl/Xhi6y7
- जम्मू-काश्मीरमधील शोपिया आणि अनंतनागमध्ये भारताच्या सुरक्षा यंत्रणांकडून एन्काऊंटर, 11 दहशतवाद्यांचा खात्मा https://goo.gl/kqBTke
- इंदूरमध्ये हॉटेलची इमारत कोसळून दहा जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती https://goo.gl/Sp71GK
- चीनचं स्पेस स्टेशन पहाटेपर्यंत पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता, स्टेशनच्या मार्गात मुंबई आणि आसपासचा परिसर https://goo.gl/RBL6CG तर इस्रोचं जीसॅट 6A सॅटेलाईटही संपर्काबाहेर
- प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा अहमदनगरातला स्टुडिओ आगीत भस्मसात, मानसिक धक्का बसल्यानं कांबळे रुग्णालयात दाखल, कांबळेंची अवघी तपश्चर्या भस्मसात https://goo.gl/LodmWE
- पुढचे 3 दिवस विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट, शेतकरी आणि नागरिकांना उष्माघातापासून काळजी घेण्याचं आवाहन https://goo.gl/PajNpn
- भारतीय टपाल खातं देशातील सर्वात मोठी बँक, आजपासून पोस्टाच्या बँकिंग सेवांना सुरुवात https://goo.gl/beMt5B
- गोवा-उत्तर प्रदेशपाठोपाठ शिवसेना कर्नाटक विधानसभेच्या रिंगणात, महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा, 50 ते 55 जागा लढवणार https://goo.gl/3XR1H4
- शहीद राजगुरु हे तर संघ स्वयंसेवक, संघाचे माजी प्रचारक नरेंद्र सहगल यांचा दावा, विरोधकांची आगपाखड https://goo.gl/VXGT4X
- इराकमध्ये आयसिसने हत्या केलेल्या 39 भारतीयांच्या मृतदेहांचे अवशेष भारतात परत आणणार, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग मोसूलला रवाना https://goo.gl/GXggDi
- शाळेत कबड्डी खेळताना चक्कर येऊन विद्यार्थ्याचा मृत्यू, पुण्यातील नवोदय विद्यालयातील धक्कादायक प्रकार https://goo.gl/rEMhMz
- पाण्याच्या टबमध्ये बुडून एक वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू, सोलापूरमधील माढ्यातील घटनेने खळबळ https://goo.gl/n4YKxW
- कोल्हापुरातील शिक्षकांच्या लढ्याला यश, सदोष रोस्टरची चौकशी होणार https://goo.gl/o2nnY6
- बॉल टॅम्परिंगसाठी मी जबाबदार, डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीचं विधान, पूर्व प्रियकरासोबतचे संबंध पुन्हा चर्चेत आल्यानं वॉर्नरकडून कृत्य घडल्याचाही दावा https://goo.gl/gjT1L6
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement