एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/07/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/07/2018*
- दूध आंदोलनाचा दुसरा दिवस, लाखो लिटर दूध रस्त्यावर, दूध दरावर तोडग्यासाठी विधानसभेत बैठक, तर दिल्लीतील बैठक तोडग्याविना https://goo.gl/aNBJa8
- पुण्याला दूध आंदोलनाची झळ, दूधसाठा संपण्याच्या मार्गावर, दोन दिवसांपासून संकलन बंद असल्याने उद्यापासून चितळेंचं दूध मिळणार नाही https://goo.gl/BzXfSw
- रत्नाकर गुट्टे महाराष्ट्राचे नीरव मोदी, शेतकऱ्यांच्या नावे 5500 कोटींचं कर्ज उचललं, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा आरोप https://goo.gl/YdXxdU
- शिवस्मारकाच्या विषयावर बोलताना भाजप आमदार अतुल भातखळकरांनी 'भलता' शब्द वापरला, विरोधक आक्रमक, भातखळकरांच्या निलंबनाची मागणी https://goo.gl/SYFLzR
- आदिवासी विद्यार्थ्यांच्या मोर्चात अनेक मुलं अनधिकृतपणे वसतिगृहात राहणारी, मुख्यमंत्र्यांचा दावा, पोलिसांनी दमदाटी केल्याचा आरोपही फेटाळला https://goo.gl/5bduzX
- मराठा आरक्षणावर निर्णय होईपर्यंत मुख्यमंत्र्यांना आषाढीची पूजा करु देणार नाही, मराठा मोर्चा समन्वयकांच्या पंढरपुरातील बैठकीत निर्णय https://goo.gl/PvhJMm
- राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या नावाची चर्चा, भाजपला नमवण्यासाठी सगळे विरोधक एकत्र येण्याबाबत उत्सुकता https://goo.gl/zEJkE1
- खड्ड्यांवरुन मनसे आक्रमक, मंत्रालयासमोरील रस्ता खोदला, 8 मनसे कार्यकर्त्यांवर सरकारी मालमत्तेचं नुकसान आणि कायद्याचं उल्लंघन या दोन कलमांअंतर्गत अटकेची कारवाई https://goo.gl/TfzMSj
- मुंबईतील खड्ड्यांवर आरजे मलिष्काचा पुन्हा बीएमसी आणि सरकारवर निशाणा, ‘झिंगाट’ गाण्याच्या चालीवर 'गेली गेली मुंबई खड्ड्यात...' नवं गाणं रिलीज https://goo.gl/St6y8i
- पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पावसाचा धुमाकूळ सुरुच, कोल्हापुरात 60 बंधारे पाण्याखाली तर कोयना धरणाचे चार दरवाजे उघडले https://goo.gl/q7GXBY
- 2006 च्या भिवंडी दंगलीतील मुख्य सूत्रधार मोहम्मद युसूफ गजाआड, सौदी अरेबियातून भारतात परतणाऱ्या मोहम्मद युसूफला मुंबई विमानतळावर बेड्या https://goo.gl/ByxQaT
- गोव्यात सार्वजनिक ठिकाणी दारु पिताना आणि कचरा टाकताना आढळल्यास 2500 रुपयांचा दंड, मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची घोषणा, 15 ऑगस्टपासून अंमलबजावणी https://goo.gl/jDYzTP
- ज्येष्ठ अभिनेत्री रीटा भादुरी यांचं निधन, किडनी निकामी झाल्याने वयाच्या 62 व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास, टीव्ही आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा https://goo.gl/S7DRiL
- फेसबुकवर वर्षभरात ‘लव्ह’ इमोजीचा सर्वाधिक वापर, तर भारतीयांची तीन मेणबत्त्या असलेल्या केकला पसंती, जागतिक इमोजी दिनानिमित्त फेसबुकची माहिती https://goo.gl/es21os
- लीड्सच्या तिसऱ्या वन डेत इंग्लंडने नाणेफेक जिंकली, भारताला फलंदाजीचं आमंत्रण; तिसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांत चुरस https://goo.gl/MQdM8t
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा























