एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 2 जून 2019 | रविवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. लोकसभा जिंकण्यासाठी 3 राज्यात भाजपनेच स्वतःचा पराभव करुन घेतला असावा, शरद पवारांची शंका, ईव्हीएमवर पुन्हा बोट https://bit.ly/2WjnPZz
2. विधानसभेसाठी मनसेची तयारी सुरु, आजपासून राज ठाकरे 3 दिवसीय पुणे दौऱ्यावर, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार https://bit.ly/2XnBf3c
3. नोटांवरुन गांधीजींचे फोटो हटवा, बीएमसी उपायुक्त निधी चौधरींचं ट्वीट, सर्वत्र टीकेचा सूर, पोस्ट उपहासात्मक असल्याचे निधी यांचे स्पष्टीकरण https://bit.ly/30V2690
4. डॉ. कलबुर्गींच्या हत्येप्रकरणी बेळगावातून एका तरुणाला अटक, कर्नाटक एसआयटीची कारवाई, आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी https://bit.ly/2Mko5my
5. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करणे योग्य नाही, पुण्यातील शिवसृष्टीची पाहणी केल्यानंतर उदयनराजे भोसलेंकडून पुरंदरेंबाबत भावना व्यक्त https://bit.ly/2Z1qUdO
6. निर्मला सीतारमण यांना शुभेच्छा देऊन काँग्रेस नेत्या दिव्या स्पंदना यांची ट्विटरवरुन एक्झिट, लोकसभेतील काँग्रेसच्या पराभवामुळे स्पंदना अस्वस्थ असल्याची चर्चा https://bit.ly/2EQksyu
7. भाजप कार्यकर्ते ममता बॅनर्जींना 'जय श्रीराम' लिहून 10 लाख पोस्टकार्ड पाठवणार, बंगालमध्ये जय श्रीरामच्या घोषणांचा वाद वाढला https://bit.ly/2WiHBEv
8. घातपात घडवण्याचा नक्षल्यांचा कट उधळला, गोंदियातील दंडारी गावात नक्षल्यांनी पुलाखाली लपवलेली स्फोटकं पोलिसांकडून जप्त https://bit.ly/2HR9f2I
9. गिरणी कामगारांसाठी ऑगस्टमध्ये 3800 घरांची लॉटरी, म्हाडाची आज 217 घरांची सोडत, अल्प उत्पन्न गटात राशी कांबळे पहिल्या मानकरी https://bit.ly/3153pCj
10. जळगाव, नाशिक, नागपूर, अहमदनगर आणि धुळ्यात मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा https://bit.ly/2Xuw3KQ
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
राजकारण
भारत
Advertisement