एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 08/07/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 08/07/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 08/07/2018
- मराठवाड्यात 10 जुलैला अतिवृष्टीचा इशारा, कोरड्याठाक मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हवामान विभागाच्या अंदाजाने दिलासा, तर कोकण आणि मुंबईतही अतिवृष्टीचा अंदाज https://goo.gl/7vxVsR
- मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या 12 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस, अनेक भागात पाणी साचलं, तर खड्ड्यांमुळे सायन-पनवेल हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा https://goo.gl/DDMY3M
- मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हलोली भागात कार, कंटेनर आणि दुचाकीचा तिहेरी अपघात, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू https://goo.gl/PB3QBr
- एसटी बसखाली चिरडून वृद्ध महिलेचा मृत्यू, सातारा मध्यवर्ती बसस्थानकातील घटना, एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल, घटना सीसीटीव्हीत कैद https://goo.gl/RQvJS9
- पुण्यात सिंहगडाच्या घाट रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक बंद झाल्याने हजारो पर्यटकांची निराशा, तर माथेरानच्या रस्त्यावरही दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक https://goo.gl/Ehv6kP
- पुणे-बंगळुरु महामार्गावर एम. बी. लिंक ट्रॅव्हल्सची बस मुळा नदीत पडता-पडता वाचली, अपघातात 9-10 प्रवासी जखमी, बस कठड्याला अडकल्याने दुर्घटना टळली https://goo.gl/sWy72K
- पुण्यातल्या गणेश पेठेतील गुरुद्वारामध्ये शीख बांधवांकडून वारकऱ्यांची सेवा, तुकोबांची पालखी आजही पुणे मुक्कामी, तर ज्ञानोबांच्या पालखीतील अश्वाचा अखेरचा श्वास https://goo.gl/RRUcAH
- भाजपाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात, ज्ञानोबां माऊलींच्या पालखीचं दर्शन, संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत रात्री बाबासाहेब पुरंदरेंना भेटणार https://goo.gl/zL6TWw
- पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय, गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यात सामान्य नागरिकाची हत्या, परिसरात दहशतीचं वातावरण https://goo.gl/iAwnS2
- अमेरिकेतील कॅनसस सिटीमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या, तेलंगणातील शरद कोप्पूच्या हत्येचं कारण अस्पष्ट https://goo.gl/UeP6Qr
- 'बिग बॉस मराठी'च्या घरातून नंदकिशोर चौगुले बाद, हुकूमशाहच्या टास्कमुळे प्रेक्षकांच्या निशाण्यावर आलेल्या नंदकिशोरला घरचा रस्ता https://goo.gl/nSNoYp
- बलात्काराच्या आरोपांनंतर महाअक्षय चक्रवर्तीचा लग्नसोहळा रद्द, बलात्कार आणि गर्भपातप्रकरणी कोर्टाकडूनही दिलासा नाही https://goo.gl/PqUz4m
- फेक न्यूजला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपचं नवीन फीचर, ‘सस्पिशिअस लिंक डिटेक्शन’च्या माध्यमातून फेक लिंकची खातरजमा करता येणार https://goo.gl/xAk5TK
- यजमान रशिया आणि स्वीडनचं फुटबॉल विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात, क्रोएशिया आणि इंग्लंड उपांत्य फेरीत https://goo.gl/Kg6xJ3
- टी-20 मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारत-इंग्लंडमधील बरोबरीची कोंडी फुटणार, निर्णायक सामन्यासाठी उभय संघ सज्ज https://goo.gl/s3jbZk
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement