एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/01/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/01/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/01/2018
- राज्यात जल, भू आणि वायू अपघाताचा विचित्र योगायोग, शनिवार ठरला अपघात वार, 7 अपघातात 30 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू https://goo.gl/jbmiTa
- सांगलीच्या पैलवानांवर काळाचा घाला, कराडवरुन परतताना क्रूझरचा मध्यरात्री भीषण अपघात, 5 पैलवानांसह 6 जणांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी https://goo.gl/5X5pGf
- पालघरमधील डहाणूच्या समुद्रात 40 विद्यार्थ्यांसह बोट उलटली, 32 जणांना सुखरुप बाहेर काढलं, दोघींचा मृत्यू, सहा बेपत्ता https://goo.gl/SzmE5E
- 2 वैमानिक आणि 5 कर्मचाऱ्यांसह ओएनजीसीचं हेलिकॉप्टर डहाणूजवळ समुद्रात कोसळलं, चौघांचे मृतदेह हाती, तिघांचा शोध सुरु https://goo.gl/t4X1s2
- मुंबईत मुलुंडमध्ये शिरलेला बिबट्या सहा तासांनी जेरबंद, बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन पकडण्यात यश, रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण https://goo.gl/f1Dumr
- राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील सेमी इंग्रजी बंद करणार, शिक्षण सचिव नंदकुमार यांची घोषणा, माध्यमिक आणि प्राथमिक शाळेतील 18 टक्के विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला https://goo.gl/L7eM72
- माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या मुलाच्या घरी ईडीचे छापे, एअरसेल-मॅक्सिस डील संशयाच्या भोवऱ्यात, अधिकार नसूनही ईडीकडून छापेमारी, चिदंबरम यांचा आरोप https://goo.gl/fjMiFz
- चार न्यायमूर्तींच्या बंडानंतर घडामोडींना वेग, पंतप्रधानांचे प्रधान सचिव आणि सरन्यायाधीशांची भेट टळली, तर अॅटर्नी जनरलना तोडगा निघण्याचा विश्वास http://abpmajha.abplive.in/
- केस बारामतीकरांसाठी केलेल्या कामाच्या बोजामुळे गेले, की पत्नीच्या त्रासाने, अजित पवारांच्या सवालाने हशा https://goo.gl/XXNG1T
- पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये व्हॅक्युम क्लिनरमध्ये अडकून महिलेचे केस कातडीसह उपटले, 165 टाक्यांची यशस्वी शस्त्रक्रिया https://goo.gl/piiSVT
- मुंबईत इमारतीच्या बांधकामावेळी कामगार तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला, छाती-पोटात रॉड घुसून जखमी https://goo.gl/TY4VHs
- मनालीत बर्फाच्छादित डोंगरांमध्ये 8 बेडरुम्सचं टुमदार घर... कंगनाच्या आलिशान बंगल्याची किंमत 30 कोटी असल्याची चर्चा https://goo.gl/739XJC
- दोन वर्षांपूर्वी चौकशीची घोषणा, मात्र मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहतांची अद्याप चौकशीच नाही, महावितरणमधील कथित भ्रष्टाचारावरुन चौकशीची मागणी https://goo.gl/czFxqF
- शेडवरील पत्र्याचं पाणी घरात पडल्यावरुन वाद, पुण्यात सख्ख्या लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या, आरोपीचा शोध सुरु https://goo.gl/yw7irX
- दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेची दमदार सुरुवात, भारतीय गोलंदाजांची ‘कसोटी’, आर्करमचं शतक हुकलं, हाशिम आमला आणि डिव्हिलियर्स क्रिजवर https://goo.gl/bwmtLL
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement