एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2020 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- मुंबईसह देशभरात विविध ठिकाणी अडकलेले मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु आणि प्रवाशांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा, देशांतर्गत वाहतुकीसाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी https://bit.ly/2W7BwYS
- राजस्थानच्या कोटामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी लवकरच परतणार; 92 एसटी बस आज धुळ्यातून रवाना तर, 31 विद्यार्थी रायगडमध्ये परतले, विद्यार्थ्यांमध्ये लक्षणं नसल्यानं होम क्वॉरंटाईन राहण्याच्या सूचना https://bit.ly/3bIPU09
- देशात आतापर्यंत कोरोनामुळे 1008 मृत्यूंची नोंद तर, कोरोनाबाधितांचा आकडा 31 हजार 787 वर; महाराष्ट्राने नऊ हजारांचा टप्पा ओलांडला https://marathi.abplive.com/
- कोरोना संकटात संपूर्ण देश एकत्रीत लढत असताना महाराष्ट्रात सत्तेसाठी राजकारण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवरून चर्चा; भाजप नेत्यांनी राज्यपालांच्या घेतलेल्या भेटीबाबत नाराजी https://bit.ly/35eLzzr
- आधी समजावून पाहा, अन्यथा पोलिसी खाक्या दाखवा, पोलिस-डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा, नाशिक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचाही आढावा https://bit.ly/35fLKu7
- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वरळी पॅटर्न देशभरात राबवला जाणार, केंद्राकडून आराखड्याची मागणी, जी दक्षिण विभागाच्या कामगिरीचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक https://bit.ly/35hLeM9
- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एक हजार रुग्णांच्या विलगीकरणाची सोय करण्यासाठी 1000 खाटांचे रुग्णालय उभारणार; बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये युद्धपातळीवर काम सुरू https://bit.ly/2zGLkkY
- मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना गावी पाठवण्याचा निर्णय चार दिवसात होणार; आमदार भास्कर जाधव यांची माहिती; तर, कोकणावासीयांच्या प्रश्नावर कुणीही राजकारण करू नये, त्यांना त्यांच्या मुळगावी आणलं जाईल, उदय सामंत यांच स्पष्टीकरण https://bit.ly/3f3O0cn
- हरहुन्नरी अभिनेता इऱफान खान यांचं कर्करोगाने अकाली निधन, कलाकार, राजकारणी, सामान्यांकडून शोक व्यक्त, इरफान खान यांच्यावर वर्सोवातील कब्रस्तानमध्ये अंत्यविधी. https://bit.ly/3aP29a2
- राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) विनाअनुदानित अल्पसंख्याक वैद्यकीय महाविद्यालयांना देखील लागू; सुप्रीम कोर्टाचा निर्णय https://marathi.abplive.com/live-tv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रीडा
Advertisement