एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 फेब्रुवारी 2021 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 फेब्रुवारी 2021 | शुक्रवार
- पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर, पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात तर आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान; केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात 6 एप्रिल रोजी मतदान तर 2 मे रोजी मतमोजणी https://bit.ly/3bFf8h3
- दहावी, बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झालेला नाही, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची एबीपी माझाला माहिती https://bit.ly/3qWgR88
- राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळण्याची शक्यता, पेट्रोल आणि डिझेलवर सध्या असलेला रु. 10.12 पैशांच्या सेसमध्ये कपात होणार का? याविषयी उत्सुकता https://bit.ly/3bG9prs
- भाजपनंतर संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर स्वकीयांचा दबाव, विदर्भातील खासदारांच्या पत्रावर अनेक आमदार, खासदार आणि नेत्यांच्या सह्या https://bit.ly/3aWcuVb
- पूजा चव्हाणच्या मोबाईलवर आलेले 45 मिस्ड कॉल्स कुणाचे, चित्रा वाघ यांचा पुणे पोलिसांना सवाल; पुणे पोलिसांकडून तपास काढून घेण्याचीही मागणी https://bit.ly/3r9RIH2
- मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली कार पार्क करुन, आरोपी दोन तास गाडीतच बसून होता https://bit.ly/3ksCryw मुकेश अंबानींच्या निवासस्थानाजवळ आढळलेल्या स्कॉर्पिओच्या मूळ मालकाची माहिती समोर https://bit.ly/3uCDX5V स्फोटकाचं नागपूर कनेक्शनही उघड, वेगाने तपास केल्याबद्धल रिलायन्सकडून मुंबई पोलिसांचे आभार
- राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे आठ हजाराहून जास्त रुग्ण, वाशिममध्ये एकाच शाळेतील 229 विद्यार्थी बाधित https://bit.ly/3bFPwRp
- चार पानांची सुसाईड नोट लिहून नांदेडमधील एसटी कंडक्टरची बसमध्ये आत्महत्या, सदोष तिकीट मशिनमुळे कामावरून काढलं जाण्याच्या भीतीपोटी आयुष्य संपवलं https://bit.ly/3dJ5mgG
- मुंबई शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण; 1900 पेक्षा जास्त अंकांनी कोसळून सेन्सेक्स 50 हजारच्या खाली, निफ्टीही 14,500 अंकावर https://bit.ly/3kuURyL
- आनंदाची बातमी! मुंबईच्या तीरा कामतला अमेरिकेतून आलेलं 'झोलजेन्स्मा’ हे औषधे मिळालं; आईवडिलांचा संघर्ष फळाला https://bit.ly/3r1sx9U
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























