एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2020 | शनिवार


शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा


1. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या कोविड-योद्ध्यांचा मानपत्र देऊन गौरव 


2. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याचं अनेक इंग्रजी, हिंदी वेबसाईट्सवर वृत्त, भारत सरकारकडून अद्याप कोणताही दुजोरा नाही 


3. भारत-चीन सीमावादावर महत्वाची बैठक पूर्ण; चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न 


4. देशात गेल्या सात दिवसात 62 हजार लोकांना कोरोनाची लागण, देशात कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 36 हजारावर तर राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 80 हजारांवर 


5. खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड्स कागदावरच; तर, राजीव बजाज हे कोविड किंवा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ नाहीत; देवेंद्र फडणवीस यांचा टोला 


6. मुंबईत येत्या आठ तारखेपासून बेस्ट बस सेवा पूर्ववत होणार, अत्यावश्यक सेवांसोबतच इतर नागरिकांसाठीही सेवा उपलब्ध; राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्णय 


7. अनलॉक 1 मध्ये सूट न मिळाल्यानं पुणे, नागपूर, वर्ध्यात सलून व्यावसायिकांचं आंदोलन, आर्थिक पॅकेजची मागणी, काळ्या फिती लावून आंदोलन 


8. वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासूनच सुरु होणार, विद्यार्थ्यांना गावाजवळच्या मेडिकल कॉलेजमध्ये परीक्षा देण्याची मुभा 


9. तळकोकणात दोडामार्गच्या मोर्ले गावात टस्कर हत्तीचा थरार, दैव बलवत्त म्हणून 3 जणांचा जीव वाचला, बागायती शेती, वस्तीचंही नुकसान 


10. लांसेट या प्रतिष्ठीत सायन्स मॅगझिनने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनबाबतचा अभ्यास मागे घेतला, 197 वर्षीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं


BLOG | झुंबड कशासाठी?, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex


Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK/enxBR