1. राज्यसभा सदस्यांच्या शपथविधीच्या वेळी उदयनराजेंच्या "जय भवानी जय शिवाजी" या उद्घोषावर आक्षेप घेतल्यावरुन राज्यात तीव्र संताप, अनेक ठिकाणी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूच्या विरोधात आंदोलने, युवक राष्ट्रवादी 20 लाख पत्रे पाठवणार


2. "जय भवानी, जय शिवाजी" ही घोषणा नियमभंग करणारी किंवा घटनाबाह्य नाही तर ती जय हिंद आणि वंदे मातरम एवढीच महत्त्वाची, शिवसेना खासदार संजय राऊत यांची भूमिका, सभागृहात यापूर्वी शपथविधीदरम्यान वेगवेगळ्या श्रद्धास्थानाच्याही घोषणा देण्यात आल्याची आठवण 

3. शिवरायांचा अपमान झाला असता तर ऐकून घेतलं असतं का? तिथेच राजीनामा दिला असता, कालच्या शपथविधीमध्ये छत्रपती शिवरायांचा अवमान झाला नसल्याचं उदयनराजेंचं स्पष्टीकरण 

4. पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर लगेच मोकळीक मिळणार नाही, पाच दिवस अनलॉक आणि दोन दिवस लॉकडाऊन हे सूत्र कायम ठेवणार असल्याची जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची माहिती

5. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द, आघाडी सरकारमधील अन्य दोन पक्षांशी चर्चा न करता नियुक्त्या केल्यामुळे निर्णय 

6. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात कोरोना योद्ध्यावर 200 ते 250 जणांच्या जमावाचा हल्ला, एका पोलिसासह वैद्यकीय कर्मचारी जखमी

7. मुंबईत 7 हजारांपेक्षा अधिक कोरोना योद्धे बाधित, पालिका, बेस्ट, मुंबई पोलीस दलातील कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यानं काळजीत भर 

8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहाची तोडफोड करणारा सापडला, 15 दिवसानंतर मुख्य आरोपीला अटक

9. सांगलीतील 400 वर्षे जुन्या वटवृक्षाला वाचवण्यात यश, राष्ट्रीय महामार्गासाठी नवा आराखडा, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडून नितीन गडकरींचे आभार

10. सुशांतसिंह राजपूतची मुख्य भूमिका असलेला दिल बेचारा चित्रपट उद्या हॉटस्टारवर प्रदर्शित होणार, सुशांतच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला

BLOG | अजूनही आपण 'मुखपट्ट्यांवरच'! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRenxBR