ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 एप्रिल 2021 | बुधवार
दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा ABP माझा टॉप 10 हेडलाईन्समध्ये...
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 एप्रिल 2021 | बुधवार*
1. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहिली ते आठवी प्रमाणेच नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय, यंदा फक्त दहावी-बारावीच्याच परीक्षा
https://bit.ly/2Rg1Z7K
2. केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक, लोकसंख्या आणि कोरोना रुग्णांच्या तुलनेत गुजरातला जास्त लस पुरवठा https://bit.ly/3dCC7dI राज्यात कोरोना लसीचे फक्त 14 लाख डोस शिल्लक; मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यातील परिस्थिती काय? https://bit.ly/3cX1acs
3. लस उपलब्ध नसल्यामुळे राज्यातील अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची कबुली.. तातडीने लस पुरवठा वाढवण्याची केंद्राला विनंती
https://bit.ly/3rXyBj9 देशात सर्वाधिक लसी महाराष्ट्राला मिळाल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दावा https://bit.ly/2R9CjJL
4. पुरेसा पुरवठा झाला तर मुंबईत पल्स पोलिओच्या धर्तीवर कोरोना लसीकरण मोहिम राबवण्याची पालिकेची तयारी, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा विश्वास https://bit.ly/3cWlc6R
5. देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस द्या, राहुल गांधींची मागणी https://bit.ly/31Qq2w9 कोरोनाच्या लस वाटपात राजकारण होतंय का? https://bit.ly/3uvLEKA
6. सचिन वाझेंच्या कोठडीत 9 एप्रिलपर्यंत वाढ, मनसुख हिरण स्फोटकांच्या कटात सामील असल्याचा NIAचा कोर्टात दावा https://bit.ly/3sWY6CJ
7. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या चौकशी अहवालात माजी आयुक्त परमबीर सिंहांवर ठपका, प्रशासकीय विरोधानंतरही सचिन वाझेंची नियुक्ती https://bit.ly/3rUcj1L माजी गृहमंत्र्यांनी वसुलीबाबत चौकशी केली; पोलीस अधिकारी राजू भुजबळ आणि संजय पाटील यांचे कबुली जबाब https://bit.ly/3rXeDVQ
8. 'निर्बंध मागे घ्या, अन्यथा बाजारपेठ उघडू', मिनी लॉकडाऊनविरोधात राज्यभरात व्यापारी आक्रमक https://bit.ly/3wtZxe1 व्यापाऱ्यांनी निर्बंधांविषयी केलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार मात्र नियम पाळण्यात सहकार्य हवे, मुख्यमंत्र्यांचं व्यापाऱ्यांना आवाहन https://bit.ly/3uqZVIn
9. पंढरपूरचे कल्याण काळे उद्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत हातावर घड्याळ बांधणार, मनधरणी करण्यात भाजपला अपयश
https://bit.ly/3mvelnV
10. किनवट तालुक्यातील सारखणी जंगल परिसरात मोठी आग; दुर्लभ पक्षी, प्राणी, वनस्पती नामशेष होण्याची भीती
https://bit.ly/2PyYAR5