दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार


1.लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्पासाठी उद्या 11 मतदारसंघात मतदान पार पडणार; मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाकडून कसोशीचे प्रयत्न https://tinyurl.com/2226swfv अहमदनगरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या एकदिवसआधीच दोन गटांत तुफान राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात https://tinyurl.com/5psdycmm


2.धनुष्यबाण ते मशाल हे स्थित्यंतर कसं होतं? उद्धव ठाकरेंनी नेमकं कुणाला जबाबदार धरलं, म्हणाले निवडणूक आयोग त्यांचा नोकर आहे https://tinyurl.com/msat84xn राम मंदिर, भ्रष्टाचार, कश्मिरी पंडित, मोदी- शहांवर हल्लाबोल, वाचा उद्धव ठाकरेंच्या बेधडक सामना मुलाखतीतील 21 मुद्दे https://tinyurl.com/msat84xn


3.देशाला जो सर्वोच्य प्राधान्य देतो, त्याचे आम्ही नेहमीच स्वागत करतो, म्हणून भाजपने राज ठाकरेंना सोबत घेतलं; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात' https://tinyurl.com/3n6zm6jh


4.देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांची माझ्याबद्दलची नाराजी दूर,  एकनाथ खडसेंची  एबीपी माझाला Exclusive मुलाखत, लवकरच भाजपत प्रवेश https://tinyurl.com/mrahyfuj सुनेच्या जबाबदारीपोटी सासरे म्हणून एकनाथ खडसे यांनी वेगळा निर्णय घेतला; खडसेंच्या भाजप पक्ष प्रवेशाबद्दल रोहिणी खडसे यांनी मांडलं रोखठोक मत https://tinyurl.com/2mv23kjk 


5.अजित पवारांचा फोन, मुख्यमंत्र्यांशी चर्चा, अखेर नाराज माणिकराव कोकाटेंची मनधरणी सफल, नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंचा प्रचार करणार https://tinyurl.com/4xe4kmyk


6.कांदा पिकवण्यासाठी केलेला खर्च 60000 अन् कांद्याच्या पिशव्याची पट्टी फक्त 10000 रुपये, मतदान होताच दरात घसरण, बळीराजाला मोठा फटका https://tinyurl.com/4xrr8htz


7.प्रचार संपताच महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर प्रपंच्यात व्यस्त; पत्नीबरोबर मंडईत भाजी खरेदी करायला पोहोचले https://tinyurl.com/52kkdphj


8.एकोणवीस वर्षीय तरुणीकडून गर्भलिंगनिदानाचं रॅकेट उघड, सोनोग्राफी जेल, टॅब, लॅपटॉप अन् 12 लाखांची रोकड जप्त; छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ https://tinyurl.com/yfpkuvp9


9.पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा मुक्काम; हवामान विभागाकडून विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी https://tinyurl.com/ysppj5e7 अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा तडाखा, 100 पोपट दगावले, शेतीचेही मोठं नुकसान https://tinyurl.com/2jxsu6h3 किल्लारीत अवकाळीचा धुमाकूळ, लातूर-धाराशिवमध्ये पावसाच्या सरी; आंबा बागांचे नुकसान https://tinyurl.com/4tcu5b9u


10.देशांतर्गत क्रिकेटमधून नाणेफेक हद्दपार? बॅटिंग- बॉलिंगचा निर्णय कसा होणार? IPL मधील इम्पॅक्ट प्लेअर बंद होणार? जय शाहांचे संकेत https://tinyurl.com/mp2fu8tb गोंधळात गोंधळ,रोहित इम्पॅक्ट प्लेअर असून सब्स्टीट्यूट फील्डर बनला,मुंबईच्या कोचचा पंचांसोबत वाद, हार्दिकची मध्यस्थी https://tinyurl.com/4k6x7xkr


एबीपी माझा स्पेशल


मतदान करा, मोफत पैठणी मिळवा, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील दुकानात महिलांसह पुरुषांना विशेष ऑफर https://tinyurl.com/se58vbkj


संजयकाका पाटील की विशाल पाटील? नेमका कौल कोणाला? सांगली मतदारसंघात कार्यकर्त्यांनी लावलेली चक्क दुचाकींची पैज कोण जिंकणार, याकडे लक्ष https://tinyurl.com/3rayxfyf