एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 20 मार्च 2019 | बुधवार | एबीपी माझा

स्मार्ट बुलेटिन | 20 मार्च 2019 | बुधवार | एबीपी माझा
1. काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत महाराष्ट्रातील सात उमेदवार जाहीर, दक्षिण-मध्य मुंबईत एकनाथ गायकवाड तर यवतमाळमधून माणिकराव ठाकरेंना संधी
2. भाजपला मतदान करू नका, राज ठाकरेंचं मनसे मेळाव्यात आवाहन, मोदी-शाहांविरोधात सभा घेणार असल्याची घोषणा
3. शरद पवारांना धक्का देत रणजीतसिंह मोहिते पाटलांचा आज भाजप प्रवेश, राष्ट्रवादीला माढा लोकसभा निवडणूक जड जाण्याची शक्यता
4. राज्यात तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुप्पटीने वाढ, गौरी सावंत यांची निवडणूक सदिच्छा दूत म्हणून निवड
5. जेट एअरवेजच्या मुंबईतल्या कंपनीला पायलटांकडून घेराव, 3 महिन्यांपासून रखडलेल्या पगाराची मागणी
6. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची मुक्तता करणार,द्रमुक आणि अण्णा द्रमुकच्या जाहीरनाम्यात आश्वासन, माणुसकीच्या नावाखाली तामिळ अस्मितेचं राजकारण
7. घराची भिंत कोसळून तीन महिलांचा मृत्यू तर दोघे जखमी, सांगलीच्या खानापूर तालुक्यातील मोहीमधील घटना
8. कर्नाटकच्या धारवाडमध्ये दुमजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
9. पिनाकी चंद्र घोष देशाचे पहिले लोकपाल, राष्ट्रपतींकडून नियुक्ती, लोकपाल कायदा संमत झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी नियुक्ती
10. आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, 23 मार्च पासून रंगणार क्रिकेटचा महामुकाबला, एलिमिनेटर आणि अंतिम सामन्याच्या तारखा नंतर जाहीर होणार
आणखी वाचा























