एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 15 एप्रिल 2019 | सोमवार | एबीपी माझा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन | 15 एप्रिल 2019 | सोमवार | एबीपी माझा
1. पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या कुलभूषण जाधवांना सोडवून आणा आणि 56 इंचाची छाती दाखवा, शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान
2. चित्रदुर्गमधल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरमधून संशयित पेटारा उतरवल्याचा काँग्रेसचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार
3. ईव्हीएमवरुन पुन्हा राजकारण तापलं, विरोधक सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार, दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचे थेट मोदींना आव्हान
4. नक्षली घडामोडींमुळे गडचिरोलीतील मतदान न झालेल्या केंद्रांवर आज मतदान, एटापल्ली तालुक्यातील चार मतदान केंद्रावर मतदान सुरु
5. पुलवामा हल्ला हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं षडयंत्र, मिझोरमचे माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेते अजिज कुरेशी यांचं वादग्रस्त वक्तव्य
6. मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होतोय, अशोक चव्हाणांची कार्यकर्त्यांसमोर खदखद, गद्दार कार्यकर्त्यांना धडा शिकवण्याचं आश्वासन
7. अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत धरणग्रस्तांचा गोंधळ, काळे झेंडे दाखवत निषेधाच्या घोषणाही दिल्या
8. आंबेडकरी नेते एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकरांकडे नेतृत्व देण्यास तयार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची आंबेडकरांना हाक
9. राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा, नाशिकमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू, आज मराठवाड्यात पावसाची शक्यता
10. क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघ ठरवण्यासाठी निवड समितीचं आज मतदान, विराट आणि धोनीसह 12 जणांवर पसंतीची मोहोर नक्की, तीन जागांसाठी चुरस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
क्रीडा
Advertisement