एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 11 जून 2019 | मंगळवार | एबीपी माझा
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी, विमान वाहतुकीवरही मोठा परिणाम, कोकणातही वरुणराजा बरसला 2. पावसात भिजताना वीजेचा शॉक लागून दोन चिमुकल्यांचा मृत्यू, कांदिवलीमधील ह्रदयद्रावक घटना तर औरंगाबादमध्ये तिघांचा अंत 3. काँग्रेसची पारंपरिक मतं फोडण्यासाठी प्लॅन आखा, अमित शाहांचा नेत्यांना कानमंत्र, तर मुख्यमंत्रिपदासाठी भाजपने रणनिती आखल्याने शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा 4. आतापर्यंत ईव्हीएमवर संशय घेणाऱ्या शरद पवारांचं निवडणूक अधिकाऱ्यांकडेही बोट, तर ईव्हीएम पुराण सोडून विधानसभेच्या कामाला लागा, अजित पवारांचा घरचा आहेर 5. आदित्य ठाकरेंकडून मतदारसंघनिहाय चाचपणी सुरु, वरळी आणि माहिम मतदारसंघाचा आढावा, विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना आणखी बळ 6. देशभर गाजलेल्या कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तीन नराधमांना जन्मठेप, तर इतर तिघांना पाच वर्षांचा कारावास, पठाणकोट न्यायालयाने फाशीची मागणी फेटाळली 7. साताऱ्याच्या जुळ्या भावांना तर बदलापूरच्या जुळ्या बहिणींना दहावीत गुणही 'जुळेच', साताऱ्याच्या शैलेश-योगेशला 77.40 टक्के तर बदलापूरच्या रिद्धी-सिद्धीला 420 गुण 8. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पटानी डिनर डेटसाठी पुन्हा एकत्र, जुहूतील हॉटेलबाहेर एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण 9. बिग बी अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट काही काळासाठी हॅक, प्रोफाईलला पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो, 'लव्ह पाकिस्तान'चाही संदेश 10. सिक्सर किंग युवराज सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, घोषणा करताना युवराज भावूक, मात्र टी-20 लीगमध्ये खेळत राहणार व्हिडीओ :
आणखी वाचा























