एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 11 जुलै 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- राज्यात कोरोना रुग्णांचा नवी उच्चांकं, दिवसभरात तब्बल 7 हजार 862 नवे कोरोना बाधित; तर 5 हजार 366 बरे होऊन घरी परतले
- पुणे आणि पिपंरी चिंचवडमध्ये पुन्हा निर्बंध, सोमवारी मध्यरात्रीपासून 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन; तर संचारबंदीला पुणे व्यापारी महासंघाचा विरोध
- ठाणे, कल्याण-डोंबिवलीतही 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्णय; तर औरंगाबाद आणि मिरा भाईंदरमध्ये 18 जुलैपर्यंत लॉकडाऊन
- बोरिवलीत इंद्रपस्त मॉलच्या बेसमेंटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी; आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु
- ठाकरे सरकारमध्ये कोणताच विसंवाद नाही, सामनाच्या मुलाखतीत शरद पवार यांचं स्पष्टीकरण; कोरोना आणि आर्थिक संकटावरही पवारांची सडेतोड उत्तरं
- गणपतीला कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा क्वॉरंटाईन कालावधी चौदावरून सात दिवस करा; पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रशासनाला निर्देश
- कोरोनामुळे अडचणीत आलेल्या सुतार, कुंभार, लोहार या समाजाला राज्य सरकारने अनुदान द्यावं, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- राज्य सरकारच्या मदतीने खाजगी हॉस्पिटल कोविड रुग्णांची लूट करतायेत; भाजप नेते किरीट सोमैया यांचा आरोप
- कोरोना रुग्णांची नावे जाहीर करण्यासाठी हायकोर्टात याचिका, राज्य आणि केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
- अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'चा टायटल ट्रॅक रिलीज; चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement