स्मार्ट बुलेटिन | 07 ऑगस्ट 2020 | शुक्रवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
![स्मार्ट बुलेटिन | 07 ऑगस्ट 2020 | शुक्रवार | ABP Majha ABP Majha Smart Bulletin for 07th August 2020 latest updates स्मार्ट बुलेटिन | 07 ऑगस्ट 2020 | शुक्रवार | ABP Majha](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/08/07142519/7-August-2020.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सीबीआयकडून रिया चक्रवर्तीसह सात जणांवर गुन्हा, विशेष चौकशी समितीही गठीत, आज ईडीकडून रियाची चौकशी
2. इंदोरीकर महाराजांनी पुत्रप्राप्तीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी संगमनेर न्यायालयात सुनावणी, इंदोरिकरांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
3. आजपासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार, हवामान विभागाचा अंदाज, मुंबई-ठाण्यासह कोकणाला तिसऱ्या दिवशीही पावसाने झोडपलं
4. कोल्हापुरात पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर, राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर
5. चार महिन्यांनंतर पुणे-पिंपर-नाशकात मॉल्स उघडले, थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझरची सोय, तर फिजिकल डिन्सन्सिंग पाळलं जात नसल्यानं नवी मुंबईतील मॉल्स बंद
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 07 ऑगस्ट 2020 | शुक्रवार | ABP Majha
6. पुण्यात यंदा गणपती मंडळांसह देखाव्यास बंदी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय, मूर्ती मंदिरात बसवण्याचं आवाहन
7. काल दिवसभरात राज्यात 11 हजार 514 नवे कोरोनाग्रस्त, तर 316 जणांचा मृत्यू, गेल्या 24 तासांत 10 हजार 854 रुग्णांची कोरोनावर मात
8. जगभरात कोरोना कहर सुरुच, आतापर्यंत 1.92 कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग, तर गेल्या 24 तासांत 6240 लोकांचा मृत्यू
9. सुशांत सिंह राजपूतनंतर आणखी एका टीव्ही कलाकाराची आत्महत्या, समीर शर्माचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला
10. सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी आलेले एसपी विनय तिवारी यांची अखेर क्वॉरंटाईनमधून सुटका, आज संध्याकाळी पाटण्याला परतणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)