१. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार तर पेगॅससवरुन विरोधक आक्रमक होण्याचे संकेत


Union Budget 2022 : आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. प्रथेप्रमाणे, वर्षाचं पहिलं अधिवेशन असल्यामुळं याची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांच्या अभिभाषणानं होणार आहे. राष्ट्रपती सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून सहसा सरकारच्या उपलब्धी आणि भविष्यातील योजनांचा तपशील दिला जाईल. तसेच, राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2021-22 (Economic Survey) सादर करतील. ज्यामध्ये देशाच्या आर्थिक स्थितीचे तपशीलवार वर्णन सादर करण्याबरोबरच आर्थिक-सामाजिक धोरणं आणि कार्यक्रमांची भविष्यातील दिशा दर्शविली जाईल.


२. राज्य सरकार आणि टास्क फॉर्सची आज महत्त्वाची बैठक, निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता, टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार निर्णय घेणार, टोपेंची माहिती


३. परमबीर सिंह वसूली प्रकरणात नवा गौप्यस्फोट, सॉफ्टवेअरचा वापर करून छोटा शकीलचा आवाज काढला; सीआयडीची माहिती


४. नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी, कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष


५. महाराष्ट्रात पुढचे 24तास थंडीची लाट कायम राहणार, किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली राहण्याचा अंदाज


6. वयाच्या दहाव्या वर्षी ठाण्याच्या सई पाटीलनं घडवला इतिहास, अवघ्या 38 दिवसांत काश्मीर ते कन्याकुमारी सायकलनं प्रवास, सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव


7. औरंगाबादच्या वैजापूरमध्ये वऱ्हाडाच्या वाहनाला भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, दहाहून अधिक गंभीर


औरंगाबाद : औरंगाबाद वैजापूर पोलिस (Aurangabad Vaijapur Accident Update) ठाण्याच्या हद्दीत शिवराई फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे.  दोन आयशर ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. यातील एक गाडीत लग्नाचं वऱ्हाड होतं. अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 22 जण गंभीर जखमी आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णलयाल हलवण्यात आलं आहे. काही जखमींना औरंगाबाद तर काहींना नाशिकला हलवल्याची माहिती मिळाली आहे.  पहाटे 3 च्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. 


8. आज व्हर्च्युअल महारॅली; यूपीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा, 30 लाख लोक उपस्थित राहणार असल्याचा दावा


9. राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या, आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर


10. राफेल नदाल ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता, अंतिम लढतीत मेदवेदेववर सनसनाटी मात, कारकिर्दीतलं विक्रमी 21वं ग्रँडस्लॅम विजेतेपद