Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 28 डिसेंबर 2021 : मंगळवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो...
1. राज्यपालांच्या मंजुरीविना विधानसभाध्यक्षपदाच्या निवडणुकीची सरकारकडून चाचपणी, आज पुन्हा महाविकास आघाडीची खलबतं, कोश्यारींना सकाळी अकरापर्यंतचा अल्टिमेटम
2. हिवाळी अधिवेशनाचा अखेचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीची उत्सुकता शिगेला
आजचा दिवस विविध राजकीय घडामोडींनी गाजण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्धार आहे. अध्यक्षपद निवडणुकीबाबत राज्यपालांना पाठवलेल्या पत्रासंदर्भात सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर न आल्यास निवडणूक घेण्यावर सरकार ठाम आहे. दुसरीकडे हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का याकडं साऱ्यांचं लक्ष लागलंय. तिकडे कोकणात वातावरण तापलंय. शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता आहे.
3. अटकपूर्व जामीनासाठी नितेश राणेंची न्यायालयात धाव, नारायण राणे रात्रीच कणकवलीत दाखल, नितेश राणे अद्याप नॉट रिचेबल
संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. आज त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. यासाठी दोन्ही बाजूंनी वकिलांची फौज उभी करण्यात आली आहे. नितेश राणे यांच्यातर्फे बाजू मांडताना अॅड. संग्राम देसाई हे युक्तिवाद करतील. तर अॅड राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर, उमेश सावंत ही कायदेतज्ञ टीम सहकार्याला असेल. विशेष सरकारी वकील म्हणून अॅड प्रदीप घरत आणि अॅड भूषण साळवी हे राज्य सरकारतर्फे ते युक्तिवाद करतील. आज दुपारी 2.45 वाजता जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु होईल. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आपला नागपूर दौरा अर्धवट सोडून कणकवलीला परतल्यानं चर्चांना आणखी उधाण आलं आहे.
4. जळगावात खडसे आणि अपक्ष आमदार चंद्रकांत पाटलांमधला वाद शिगेला, रोहिणी खडसेंच्या वाहनावर दगडफेक, तर राजकीय अस्तित्व संपवण्याच षडयंत्र आखल्याचा चंद्रकांत पाटलांचा आरोप
5. राज्यातल्या 47 नगर पंचायती आणि परिषदेवर प्रशासकांची नेमणूक, कोविडमुळं निवडणुका लांबणीवर पडल्यानं निर्णय
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 28 डिसेंबर 2021 : मंगळवार
6. वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि मुलांच्या लसीकरणावर रात्री मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सची बैठक, जानेवारीत आढावा घेऊन शाळांचा विचार करणार, राज्य टास्क फोर्सची माहिती
7. लहान मुलांच्या लसीकरण नोंदणीची तारीख ठरली, 1 जानेवारीपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार, 15 ते 18 वयोगटातील मुलं लसीकरणासाठी पात्र
8. नवी मुंबईतील डान्सबारवरील एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशननंतर सरकारला जाग, उद्या उच्च स्तरिय अधिकाऱ्यांची बैठक, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती, कारवाईचं आश्वासन
9. जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी थेट इंग्लंडच्या राणीच्या हत्येचा कट, एका भारतीय तरुणाला अटक
10. अशेस मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा धुव्वा, एक डाव आणि चौदा धावांनी कांगरुंचा विजय, मालिका खिशात